जगप्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्टने कोरोना लढ्यासाठी दान केले तब्बल ३ हजार डाॅलर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे बर्‍याच लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. अशा परिस्थितीत अनेक सुपरस्टार्स आपल्या चाहत्यांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. गायिका टेलर स्विफ्टने पैशाच्या कमतरतेमुळे अडकलेल्या चाहत्यांना ३-३ डॉलर्सची मदत केली. आश्चर्यकारक मदत मिळाल्यानंतर आनंदी चाहतेसुद्धा आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

अलीकडेच टेलरच्या चाहत्या हॉली टर्नरने ट्विटरवर शेअर केले आहे की सिंगरने ३ हजार डॉलर्स पाठवून त्याला मदत केली आहे. हॉलीच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूमुळे म्यूजिक इंडस्ट्रीची हालत बेकार झाली आहे. अशा परिस्थितीत ते आर्थिक अडचणीत सापडले आहे. हॉलीने लिहिले की पैशांच्या अभावामुळे ती आता न्यूयॉर्क शहरात राहू शकणार नाही. टेलरकडून मदत मिळाल्यामुळे, हॉलीचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसू शकत नाहीये. टेलरने तिच्या चाहत्याला लिहिले की, तुम्ही नेहमी माझ्यासाठी उपस्थित होता आणि आता मी तुमच्याबरोबर आहे. आशा आहे की यामुळे आपल्याला मदत मिळेल.

त्याच वेळी, विदेशी अहवालानुसार टेलरने चाहत्याला आर्थिक मदत केली.गायिकेकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर फॅनने लिहिले की, ती एक सुंदर व्यक्ती आहे. यापूर्वीही बऱ्याच सेलिब्रिटींनी कोरोनाशी सामना करण्यासाठी देणगी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा २१५वर

धक्कादायक! अमेरिकेत १ ते २ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती

जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

इटलीमध्ये कोरोनाचे एवढे बळी का?

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

Leave a Comment