Freedom 251 Scam : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन घोटाळ्याविषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Freedom 251 Scam : जेव्हा कधी आपल्याला फोन घ्यायचा असतो तेव्हा पहिला प्रश्न उभा राहतो तो बजटचा. आपण नेहमी कमी किंमतीत जास्त फीचर्स असलेला स्मार्टफोन मिळवायच्या प्रयत्नात असतो. तर 2016 मध्ये रिंगिंग बेल्स कंपनी देखील असाच एक स्मार्टफोन घेऊन आली होती. ज्याची किंमत फक्त 251 रुपये होती. त्यावेळी देशातच नाही तर जगभरात त्याची चर्चा झाली होती. त्यावेळी यासाठीचे बुकिंगही सुरू झाले होते. मात्र, 5-6 महिन्यांनंतरही हा फोन लोकांना मिळालाच नाही तेव्हा लोकांनी याबाबत आवाज उठवला. ज्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली असता, कंपनीने लोकांची फसवणूक केल्याचे उघड झाले. यानंतर सरकारने कंपनीवर कारवाई करत कंपनीला लोकांचे पैसे परत करण्यास सांगितले.

Adcom terms Freedom 251 scam of millennium - India Today

आजपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर Freedom 251 हा जगातील सर्वात स्वस्त मोबाईल मानला जातो. मात्र, हा एक घोटाळा असून मोबाईल लोकांच्या हाती आला नसल्याने हे चुकीचे आहे. कंपनीने या फोनची नियमित किंमत 500 रुपये सांगितली होती, जी त्यावेळेस जास्त नव्हती. त्याकाळी फीचर फोनसाठी 1000 रुपये खर्च करावे लागत होते. त्यामध्ये कॅमेरा, टच स्क्रीन आणि अँड्रॉइड सारखे फीचर्स फक्त 500 रुपयांमध्ये स्मार्टफोन मिळणे म्हणजे एक प्रकारे ती लॉटरीच होती.

Freedom 251: Ringing Bells makes Rs 63 Crores in 2 days from world's  cheapest smartphone! | India.com

याशिवाय रिंगिंग बेल्सने 50 लाख फोन विकण्याचे लक्ष्यही ठेवले होते. मात्र पहिल्याच दिवशी कंपनीची वेबसाइट क्रॅश झाली. मात्र, त्यानंतरही कंपनीने 30 हजारांच्या ऑर्डर घेतल्या होत्या. यानंतर बुकिंग बंद करत कंपनीने दावा केला की, त्यांना 1.75 कोटी युनिट्सच्या प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत. Freedom 251 Scam

त्यावेळी देशातील अनेक लोकांकडून हा फोन ऑर्डर करण्यात आला होता. मात्र त्याची डिलिव्हरी तो कोणालाच मिळाली नाही. त्याच वेळी, कंपनीने सुरुवातीला 30,000 लोकांना प्रीऑर्डरची रक्कम परत करण्याबाबत सांगितले होते. यानंतर कंपनीने सांगितले की, फोनची डिलिव्हरी झाल्यावर ते पेमेंट घेतील, मात्र हा फोन कधीच डिलिव्हर केला गेला नाही. Freedom 251 Scam

स्मार्टफोन फ्रीडम 251 का सपना दिखाने वाला मोहित गया जेल - Revised : Mohit  who dreamed of Smartphone Freedom 251 went to jail - Uttar Pradesh  Ghaziabad Crime News

कंपनीच्या प्रमुखाला अटक

याबाबत कंपनीचे संचालक मोहित गोयल आणि अध्यक्ष अशोक चढ्ढा यांच्याविरुद्ध आयपीसी कलम-420 सारखा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानंतर कंपनीचे प्रमुख मोहित गोयल यांना अटक करण्यात आली. कंपनीने लोकांना अशा फोनचे स्वप्न दाखवले होते जो कधीही बनलेलाच नव्हता. आता तर कंपनीचे डोमेनही विकले गेले आहे आणि फोन तर विसराच.

BIS सर्टिफिकेशन नाही

20 फेब्रुवारी 2016 रोजी कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले. त्यावेळी कंपनीकडून सादर करण्यात आलेल्या उत्पादनाला BIS सर्टिफिकेशन मिळाले नसल्याचे निदर्शनात आले. वास्तविक, कोणताही स्मार्टफोन किंवा इतर उत्पादन भारतात लॉन्च करण्यासाठी कंपनीला ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सचे सर्टिफिकेशन घ्यावे लागते. Freedom 251 Scam

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://en.wikipedia.org/wiki/Freedom_251

हे पण वाचा :
Kotak Mahindra Bank कडून ग्राहकांना मोठा धक्का, कर्जावरील व्याज दरात केली वाढ
EDLI Scheme म्हणजे काय ??? जाणून घ्या त्याच्याशी संबंधित ‘या’ खास गोष्टी
Aadhar Card अपडेट करण्यासाठी 14 जूनपर्यंत द्यावे लागणार नाहीत पैसे, अशा प्रकारे करा अपडेट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, पहा आजचे नवीन भाव
Komaki LY Pro : दोन बॅटरी असलेली ‘ही’ गाडी एका चार्जमध्ये देते 180 किमी पर्यंतची रेंज, किंमत जाणून घ्या