हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EDLI Scheme : EPFO कडून देशभरातील आपल्या सदस्यांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. यापैकीच एक एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम, (EDLI) देखील आहे. ज्याअंतर्गत या योजनेतील सदस्यांचे सर्व हयात/आश्रित कुटुंबातील सदस्यांना कर्मचाऱ्याचा मृत्यूनंतर EDLI Scheme चा लाभ दिला जाईल.
एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम 1976 (EDLI Scheme) चा उद्देश कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायदा 1952 (‘EPF कायदा’) अंतर्गत समाविष्ट असलेल्या आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांना लाईफ इन्शुरन्सचा लाभ देणे हा आहे. इथे हे लक्षात घ्या कि, या अंतर्गत पात्र कुटुंबातील सदस्यांना इन्शुरन्स लाभ दिला जातो, जेणेकरून सेवेदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास आर्थिक मदत देता येईल.
EDLI Scheme ची प्रमुख वैशिष्ट्ये जाणून घ्या
सेवेत असताना मृत्यू झाल्यास ईपीएफ सदस्याच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसाला 7 लाख रुपये दिले जातील.
जर मृत सदस्य त्याच्या मृत्यूपूर्वी 12 महिने सतत नोकरीत असेल, तर कमीत कमी इन्शुरन्स लाभ 25 लाख आहे.
कंत्राटी/तात्पुरत्या कामगारांच्या कुटुंबांना लाभ मिळावा यासाठी फक्त एकाच आस्थापनामध्ये सतत नोकरीची अट उदार करण्यात आली असून, ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी गेल्या 12 महिन्यांत नोकरी बदलली आहे त्यांच्या कुटुंबांनाही हा लाभ उपलब्ध करून दिला जात आहे.
कर्मचार्यांच्या मासिक पगाराच्या 0.5% दराने नियोक्त्याचे किमान योगदान 15,000 रुपये पगार मर्यादेपर्यंत.
यासाठी कर्मचार्याच्या कोणत्याही योगदानाची गरज नाही. पीएफ सदस्यांचे या योजनेमध्ये आपोआप रजिस्ट्रेशन केले जाते. हा लाभ थेट नॉमिनी व्यक्तीच्या किंवा कायदेशीर वारसाच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो.
तज्ञांच्या मते, EPF कायदा लागू असणारे सर्व कारखाने आणि इतर आस्थापनांच्या कर्मचार्यांना EDLI योजना लागू आहे ज्यांना होतो, जोपर्यंत कारखाना किंवा आस्थापना EPF कायद्यांतर्गत सूट मिळत नाही. तसेच सेवेमध्ये असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर नॉमिनी व्यक्ती किंवा अशा मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना एकरकमी इन्सुरन्सची रक्कम दिली जाते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.epfindia.gov.in/site_docs/PDFs/Downloads_PDFs/EDLI_1976.pdf
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर