हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षांपासून ऑटोमोबाईल क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. अनेक कार उत्पादन कंपनी बाजारात नवनवीन गाड्या आणत आहेत. यामध्ये हॅचबॅक कार, SUV आणि सेडान कार्सचा समावेश आहे . परंतु जगात असेही अनेक लोक आहेत जे कमी आकाराच्या गाड्या खरेदी करण्यावर भर देतात. त्यासाठी त्यांची कारणेही वेगवेगळी असू शकतात. पण तुम्हाला माहित आहे का की जगातील सर्वात लहान कार कोणती आहे? या कारचे नाव आहे Peel P50. चला या गाडीची वैशिष्ट्ये जाणून घेऊया….
पील P50 ची लांबी फक्त 1,371 मिमी, रुंदी 1,041 मिमी आणि उंची 1,200 मिमी आहे. या कारचा व्हीलबेस देखील फक्त 1,270 मिमी आहे. या छोट्या कारमध्ये फक्त एकच हेडलाइट आणि एक दरवाजा आहे. कारचे कर्ब वजन 59 किलो ते 110 किलोपर्यंत आहे.
ही कार पेट्रोल आणि इलेक्ट्रिक या दोन्ही मॉडेल मध्ये येते. पील P50 49 cc टू स्ट्रोक इंजिन मिळते. हे इंजिन 4.2 Bhp पॉवर आणि 5 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 3 स्पीड मॅन्युअल गियर बॉक्सला जोडलेले आहे . जगातील या सर्वात लहान कारचे टॉप स्पीड 61 किमी प्रतितास आहे. तर ही गाडी प्रति लिटर 80 किलोमीटर पर्यंत मायलेज देते. तर इलेक्ट्रिक कारमध्ये डीसी ब्रशलेश मोटर मिळते. इलेक्ट्रिक मॉडेलचे टॉप स्पीड 50 किमी/ प्रतितास आहे.
ही कार कॅप्री ब्लू, डेटोना व्हाईट, ड्रॅगन रेड, जॉयविले पर्पल आणि सनशाईन यलो या पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. ही कार भलेही आकाराने लहान आहे परंतु तिची किंमत मात्र काय कमी नाही. जगातील या सर्वात छोट्या गाडीची किंमत सुमारे 12 लाखांच्या आसपास आहे.