औरंगाबाद | कोरोना महामारीने संपूर्ण राज्यभर थैमान घातले आहे. आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असून ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या तिसर्या लाटेत रुग्ण वाढतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. देशातील 21 राज्यांपैकी 70 जिल्ह्यामध्ये चौथा राष्ट्रीय सेरो सर्वे करण्यात आला. या सर्वेनुसार देशातील 40 कोटी नागरिकांना तिसर्या लाटेत करण्याचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोरोनाला हरवण्यासाठी केल्या जाणाऱ्या लसीकरणामुळे 8 लाख नागरिकांमध्ये अॅण्टिबॉडीज तयार झाल्या आहेत. तिसऱ्या लाटेमध्ये 4 लाख नागरिक कोरोना बाधित होण्याचा धोका आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम दिसून येईल. असे तज्ञांचे मत आहे. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी महिना भरापूर्वीच याबाबत धोक्याचा इशारा दिला होता. ही कोरोना महामारीची परिस्थिती सोडवण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना सुरू होत्या.
त्याचबरोबर मनपाने कोरोनाच्या चाचण्यामध्ये वाढ केली होती. शहरात कमीत-कमी पाच लाख नागरिक बाधित होतील असा अंदाज आस्तिक कुमार पाण्डेय यांनी काढला होता. परंतु आता सेरो सर्वेक्षणातून हा आकडा चार लाखांपर्यंत आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 1 लाख 47 हजार 82 एवढी नागरिक बाधित झाले होते. आता कोरोनाची तिसरी लाट डेंजर असेल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.