औरंगाबाद | जिल्ह्यात शुक्रवारी नव्या 46 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये मनपा भागातील 10 ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरामध्ये 50 जणांना सुट्टी देण्यात आली. तर उपचारादरम्यान 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात सध्या 308 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील 281 आणि शहरातील 27 रुग्णांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 46 हजार 900 एवढी झाली आहे. यापैकी जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 43 हजार 124 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. आज पर्यंत 3 हजार 668 रुग्णांचा मृत्यू झाला आहे .मनपा हद्दीमध्ये 17 आणि ग्रामीण भागातील 33अशा 50 रुग्णांना शुक्रवारी सुट्टी देण्यात आली आहे. उपचार सुरू असताना पेंडेफळ, वैजापूर येथील 70 वर्षीय महिला, आंबा, कन्नड येथील 60 वर्षीय पुरुष भवानीनगर, पैठण येथील 62 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील एकूण रुग्ण
एन -9 येथे 1, बीड बायपास 1, बजरंग चौक 1, मयूर पार्क, हर्सुल 1, उल्कानगरी 2, इतर 4,
औरंगाबाद 5, फुलंब्री 1, गंगापूर 5, कन्नड 7, खुलताबाद 1, वैजापूर 10, पैठण 7