WPL 2024 Schedule : मुंबई इंडियन्स Vs दिल्ली कॅपिट्ल्समध्ये होणार पहिला सामना; BCCI कडून वेळापत्रक जाहीर

WPL 2024 Schedule MI Vs DC
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

WPL 2024 Schedule : BCCI कडून महिला आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 23 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. महिला आयपीएलचा हा दुसरा हंगाम असेल. यंदाही या स्पर्धेत एकूण ५ संघांचा समावेश असून २२ सामने खेळवण्यात येतील. पहिलाच सामना गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कपिटल्स (MI vs DC) यांच्यात पाहायला मिळणार आहे.

मागील वुमन प्रीमिअर लीगचे सर्व सामने (WPL 2024 Schedule) मुंबईत खेळवले गेले होते, मात्र यंदाची स्पर्धा बंगळुरू आणि मुंबईत आयोजित करण्यात आले आहेत. यातील 11 सामने बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आणि 11 सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहेत. या वूमन प्रीमिअर लीग मध्ये साखळी फेरीत 20 सामने खेळवले जातील आणि त्यानंतर एलिमिनेटर आणि अंतिम सामने खेळवले जातील. साखळी फेरीत टॉप ला असणारा असणारा संघ थेट अंतिम फेरीत धडक मारेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचा संघ एलिमिनेटर खेळतील. 15 मार्चला एलिमिनेटर आणि 17 मार्चला अंतिम सामना दिल्लीत खेळवला जाईल. हि स्पर्धा एकूण २४ दिवस चालणार असून दररोज फक्त एकच मॅच होणार आहे.

WPL मध्ये कोणकोणत्या संघाचा समावेश आहे –

मुंबई इंडियंस (MI)
रॉयल चैलेंजर्स बैंगलोर (RCB)
दिल्ली कैपिटल्स (DC)
यूपी वॉरियर्स (UPW)
गुजरात जाएंट्स (GG)

कसे आहे वेळापत्रक – WPL 2024 Schedule

23 फेब्रुवारी- MI vs DC संध्याकाळी 7:30 PM चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
24 फेब्रुवारी- RCB vs UPW संध्याकाळी 7:30 चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
25 फेब्रुवारी – GG vs MI संध्याकाळी 7:30 PM चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
26 फेब्रुवारी- UPW vs DC संध्याकाळी 7:30 PM चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
27 फेब्रुवारी – RCB vs GG संध्याकाळी 7:30 PM चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
28 फेब्रुवारी- MI vs UPW संध्याकाळी 7:30 PM चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
२९ फेब्रुवारी – RCB विरुद्ध DC संध्याकाळी 7:30 PM चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
1 मार्च – UPW vs GG संध्याकाळी 7:30 PM चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
2 मार्च- RCB vs MI संध्याकाळी 7:30 PM चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
3 मार्च- GG vs DC संध्याकाळी 7:30 PM चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
4 मार्च -UPW vs RCB संध्याकाळी 7:30 चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
5 मार्च -DC vs MI संध्याकाळी 7:30 PM अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
6 मार्च -GG vs RCB संध्याकाळी 7:30 PM अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
7 मार्च -UPW vs MI संध्याकाळी 7:30 PM अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
8 मार्च -DC विरुद्ध UPW संध्याकाळी 7:30 PM अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
9 मार्च- MI vs GG संध्याकाळी 7:30 PM अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
10 मार्च- DC विरुद्ध RCB संध्याकाळी 7:30 PM अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
11 मार्च- GG vs UPW संध्याकाळी 7:30 अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
12 मार्च -MI vs RCB संध्याकाळी 7:30 अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
13 मार्च –DC vs GG संध्याकाळी 7:30 अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
15 मार्च- एलिमिनेटर संध्याकाळी 7:30 अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
17 मार्च -फायनल संध्याकाळी 7:30 अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली