इलॉन मस्कच्या नेतृत्वाखाली एक्समध्ये नवे फीचर्स ; लवकरच पेमेंट ऑप्शन येणार

elon musk twitter
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली एक्स जे कि पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जात होते . ते सतत नव्या फीचर्सवरती भर देताना दिसतात. ज्यामुळे लोकांचे आकर्षण वाढत आहे. या अँपमध्ये कंपनी लवकरच नवीन बदल करणार आहे. या प्लॅटफॉर्मवर पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देणार आहे . हे एक आधुनिक युगाच्या दिशेने टाकलेलं महत्वाचं पाऊल ठरेल .

एक्सवर पेमेंट ऑप्शन दिसणार

तुम्हाला एक्सच्या लेफ्ट-हँड नेव्हिगेशन पॅनेलमध्ये बुकमार्क फीचरच्या खाली पेमेंट हा ऑप्शन दिसेल. हे पेमेंट वॉलेट प्रणालीवर आधारित असेल जे की थेट बँक खात्याशी लिंक असेल. या फीचरमुळे लाखो वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवरूनच आर्थिक व्यवहार करण्याची सोय उपलब्ध होईल. या बदलामुळे लोक लवकरच एक्सवरून पैसे ट्रान्सफर करू शकतील, बॅलन्स तपासू शकतील, आणि ट्रांजेक्शन हिस्ट्री पाहू शकतील.

एक्सचे बदलते रूप

एक्स हे सुरुवातीला फक्त माहिती शेअरिंग करणारे प्लॅटफॉर्म होते . आता त्यामध्ये सातत्याने बदल झालेले दिसून येतात. त्यामध्ये व्हिडिओ, ऑडिओ कॉलिंग, आणि सबस्क्रिप्शनसारख्या सेवांसोबत आता पेमेंटसारखी सेवा देखील मिळणार आहे . त्यामुळे एक्स वापरकर्त्यांसाठी एक व्यापक आणि सुविधाजनक प्लॅटफॉर्म म्हणून उभा राहील.

पब्लिक ट्विट्स आणि चॅटबॉट इंटरॅक्शनचा वापर

कंपनीने आपल्या एआय मॉडेलला ट्रेन करण्यासाठी पब्लिक ट्विट्स आणि चॅटबॉट इंटरॅक्शनचा वापर करण्याची योजना आखली आहे. त्यामध्ये वापरकर्त्यांना त्यांचा डेटा एआयसाठी वापरण्यापासून बाहेर पडण्याचा पर्याय दिला आहे. कंपनीने सेफ्टी हँडलवरून एका पोस्टद्वारे ही सुविधा देणार असून , ज्या वापरकर्त्यांना आपला ट्विट डेटा एआय मोडेल प्रशिक्षणासाठी वापरण्याची इच्छा नाही ते ऑप्ट आउट करू शकतात . त्यांना त्यामधून बाहेर पडण्याचा ऑपशन दिला जाईल .