हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल निर्माता कंपनी Xiaomi ने आपले २ दमदार स्मार्टफोन जागतिक बाजारात लॉन्च केले आहेत. Xiaomi 12T आणि Xiaomi 12T Pro असं या दोन्ही मोबाईलचे नाव आहे. या मोबाईलचे खास वैशिष्ट्ये म्हणजे स्मार्टफोनला 200 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि किंमत याबाबत…
Xiaomi चे हे स्मार्टफोन Android-12 आधारित MIUI 13 वर काम करतात. Xiaomi 12T आणि Xiaomi 12T Pro मध्ये 2712 x1220 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असून हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षणासह येतो. दोन्ही मोबाईल मध्ये 120W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की हा मोबाईल फक्त 19 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकतो.
मोबाईलच्या कॅमेराबाबत बोलायचं झाल्यास, Xiaomi 12T Pro मध्ये 200-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आहे. तर दुसरीकडे Xiaomi 12T मध्ये 108 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि विडिओ कॉल साठी दोन्ही हँडसेटमध्ये 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम, 5जी, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत. मोबाईलच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास, 12T Pro च्या 8GB RAM + 128GB अंतर्गत स्टोरेज वेरिएंटची किंमत 749 युरो (सुमारे 60,500 रुपये) आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या Xiaomi 12T ची किंमत 599 युरो (अंदाजे 48,400 रुपये) आहे. हे दोन्ही स्मार्टफोन सिल्व्हर, ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केले आहेत.