Xiaomi 14 CIVI : Xiaomi ने लाँच केला 2 सेल्फी कॅमेरावाला मोबाईल; पहा किंमत किती?

Xiaomi 14 CIVI launched
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Xiaomi ने भारतीय बाजारात डबल सेल्फी कॅमेरा असणारा मोबाईल लाँच केला आहे. Xiaomi 14 CIVI असे या स्मार्टफोनचे नाव असून हा मोबाईल निळ्या, काळ्या आणि हिरव्या रंगात उपलब्ध कऱण्यात आलाय. आज १२ जून २०२४ ला दुपारी २ वाजल्यापासून मोबाईलचे प्री- बुकिंग सुरु झालं आहे. आज पण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

6.55 इंचाचा डिस्प्ले –

Xiaomi 14 CIVI मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.55 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1,236×2,750 पिक्सल रिझोल्युशन आणि 3000 nits पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. कंपनीने मोबाईल मध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर वापरला असून 8GB + 256GB आणि 12GB + 512GB स्टोरेज अशा २ स्टोरेज पर्यायात हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे.

कॅमेरा – Xiaomi 14 CIVI

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायच झाल्यास, Xiaomi 14 CIVI मध्ये पाठीमागील बाजूला 50MP चा मुख्य कॅमेरा, 50MP चा टेलिफोटो कॅमेरा आणि 12MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा देण्यात आलाय. महत्वाची बाब म्हणजे सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32MP चे २ फ्रंट कॅमेरे देण्यात आलेत. यातील एक मुख्य कॅमेरा असेल तर दुसरा अल्ट्रा वाईड सेल्फी कॅमेरा आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 4700mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

Xiaomi 14 CIVI च्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे तर 12GB+512GB स्टोरेज मॉडेलची किंमत 47,999 रुपये आहे. आजपासूनच या मोबाईलचे प्री- बुकिंग सुरु झालं आहे. तुम्ही जर ICICI क्रेडिट कार्ड्स आणि HDFC क्रेडिट कार्ड्सचा वापर केल्यास 3000 रुपयांची सूट तुम्हाला मिळू शकते.