Xiaomi 14 Series : MWC 2024मध्ये प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक ब्रँड Xiaomi ने Xiaomi 14 Series लाँच केली आहे. या सिरीज अंतर्गत कंपनीने Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Ultra हे दोन मोबाईल लाँच केले आहेत. या स्मार्टफोन मध्ये 16GB रॅम सह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. आज आपण या सिरीजचे स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Xiaomi 14 –
Xiaomi 14 मध्ये कंपनीने 6.36 इंचाचा CrystalRes AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेट, 3000 nits पीक ब्राइटनेससह येतो. या डिस्प्लेला गोरिला ग्लास प्रोटेक्शन सुद्धा देण्यात आले आहे. या स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेट वापरण्यात आली असून हा मोबाईल Android 14 वर आधारित Hyper OS या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Xiaomi 14 मध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 50MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50MP टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोरील बाजूला विडिओ कॉल आणि सेल्फी साठी 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. स्मार्टफोन मध्ये 4610mAh ची बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 90W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
Xiaomi 14 Ultra –
Xiaomi 14 Ultra मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.73 इंचाचा QHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 3200×1440 पिक्सेल रिझोल्यूशन, 3000 nits पीक ब्राइटनेस आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या मोबाईल मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला असून हा स्मार्टफोन Android 14 आधारित HyperOS ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Xiaomi 14 Ultra मध्ये 50 मेगापिक्सेल चा Sony LYT900 मुख्य कॅमेरा, 50MP टेलिफोटो झूम लेन्स आणि 50MP अल्ट्रावाइड शूटर लेन्स कॅमेरा बसवण्यात आला आहे. तर समोरील बाजूला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. मोबाईल मध्ये 5300mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 90W वायर्ड चार्जिंग आणि 80W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. (Xiaomi 14 Series)
किंमत किती ? Xiaomi 14 Series
Xiaomi 14 हा स्मार्टफोन कंपनीने 8GB/256GB, 12GB/256GB, 16GB/512GB आणि 16GB/1TB अशा ४ व्हेरिएन्टमध्ये आणला आहे. जागतिक बाजारात या मोबाईलची सुरुवातीची किंमत 999 यूरो (म्हणजेच अंदाजे 89,700 रुपये) आहे. तर दुसरीकडे Xiaomi 14 Ultra हा मोबाईल 16GB रॅम आणि 1 टीबी स्टोरेजसह येत असून त्याची किंमत 1,499 यूरो (म्हणजेच अंदाजे 1.3 लाख रुपये आहे)