हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या वर्षभरापासून इलेक्ट्रिक गाड्यांची मोठी चलती आहे. पेट्रोल- डिझेलच्या खर्चातून मार्ग काढण्यासाठी ग्राहक इलेक्ट्रिक गाडयांना आपली पसंती दाखवत आहेत. त्यामुळेच ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन जवळपास सर्व वाहन निर्माता कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लाँच करत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी Xiaomi ने Electric Scooter 4 Lite चे सेकंड जनरेशन लाँच केलं आहे. आज आपण या स्कुटरचे खास फीचर्स आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…
Xiaomi Electric Scooter 4 Lite च्या या सेकंड एडिशनमध्ये अनेक अपडेटेड फीचर्स देण्यात आले आहेत. हि इलेक्ट्रिक स्कूटर जास्तीत जास्त अंतर पार करावी यासाठी तिच्या बॅटरीची क्षमता वाढवण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कुटर मध्ये कंपनीने 9600mAh बॅटरी दिली आहे. हि बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 तासांचा वेळ लागतो. परंतु एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर हि स्कूटर २५ किलोमीटर अंतर पार करू शकते. या दरम्यान तिचे टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास इतकं राहील. कंपंनीने यामध्ये ३ मोड दिले आहेत.
Xiaomi Electric Scooter 4 Lite चे वजन अवघे 16.2 किलो आहे. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, या स्कूटरमध्ये E-ABS, ड्रम ब्रेक 10 इंच वायवीय टायर्ससह इंटिग्रेटेड डिस्प्ले आहे या डिस्प्ले वरून तुम्ही गाडीचे स्पीड आणि बॅटरी लेव्हल चेक करू शकता. कंपनीने या सेकंडरी मॉडेलची किंमत अजून जाहीर केलेली नाही. परंत्तू, Xiaomi ने त्यांचे जुने मॉडेल 449.99 युरो मध्ये लॉन्च केले होते. यापेक्षा जास्त किमतीत कंपनी नवीन मॉडेल बाजारात आणण्याची शक्यता आहे.