Yamaha Aerox 155 : Yamaha ने लाँच केली जबरदस्त Scooter; पहा किंमत आणि वैशिष्ठ्ये

Yamaha Aerox 155
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yamaha Motor India ने आपली स्कुटर Aerox 155 चे अपडेट व्हर्जन लाँच केलं आहे. कंपनीने 1,42,800 रुपयांच्या एक्स शोरूम किमतीमध्ये ही स्कुटर बाजारात आणली आहे. दिसायला अतिशय स्पोर्टी लूक आणि बघता क्षणीच सर्वांच्या पसंतीला उतरेल अशी ही Aerox 155 तुम्हाला मेटॅलिक सिल्व्हर, मेटॅलिक ब्लॅक, रेसिंग ब्लू आणि ग्रे वर्मिलियन या चार रंगांच्या पर्यायामध्ये खरेदी करता येईल. चला आज आपण जाणून घेऊया यामाहाच्या या अपडेटेड स्कुटरची खास वैशिष्ट्ये ….

Yamaha Aerox 155

लूक आणि डिझाईन –

Yamaha Aerox 155 च्या अपडेटेड व्हर्जन मध्ये तुम्हाला आधी सारखंच स्पोर्टी डिझाइन मिळेल. स्कुटरच्या समोरील बाजूला समान स्प्लिट हेडलाइट आणि हँडलबारवर एक लहान व्हिझर मिळतो. या अपडेटेड व्हर्जन स्कूटरला काळ्या रंगात आणि सोनेरी स्टिकर्ससह सिल्व्हर पेंटमध्ये तयार करण्यात आलंय. या पेंट स्कीम मध्ये ही स्कूटर आणखी सुंदर दिसते. Yamaha Aerox 155 मजबूत चाकेही देण्यात आली आहेत.

Yamaha Aerox 155

 

इंजिन –

गाडीच्या इंजिनबाबत सांगायचं झाल्यास, Aerox 155 मध्ये 155cc सिंगल सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, इंधन-इंजेक्‍टेड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 13.9Nm सह 8,000rpm वर 15bhp टॉर्क जनरेट करते. हे इंजिन CVT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. भारतात उत्सर्जनाचे नवीन नियम लागू झाले आहेत त्यानुसार यामाहा ची Aerox 155 OBD2 नियमांला अनुरूप अशी बनवण्यात आली आहे.

Yamaha Aerox 155

फीचर्स –

Yamaha Aerox 155 च्या अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये तुम्हाला एलईडी लाइटिंग, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ऑटोमॅटिक स्टार्ट-स्टॉप, स्मार्ट मोटर जनरेटर आणि ABS सारखी वैशिष्ट्ये आहेत. तसेच या स्कुटरला समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस ट्विन-स्प्रिंग लोडेड शॉक अब्सॉर्बर्स मिळेल. ब्रेकिंगसाठी, Yamaha Aerox 155 च्या पुढील बाजूस डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक आहेत