हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या तब्बल 5458 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 1 मार्च 2023 यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2023 आहे.
संस्था – यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर
एकूण पदे – 5458 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. आयटीआय / Non- ITI – 1944 पदे
उमेदवार 10वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
2. आयटीआय / Ex- ITI – 3514 पदे
उमेदवार NCVT किंवा SCVT द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेमधून संबंधित ट्रेड चाचणी उत्तीर्ण (किमान 50% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य) असणे आवश्यक.
वय मर्यादा – 15 वर्षे ते 24 वर्षे [SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट]
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 1 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2023
परीक्षा फी – फी नाही
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड लेखी परीक्षा/मेरिट लिस्टवर आधारित असेल.
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – yantraindia.co.in/home.php