रोहित- कोहली नव्हे ‘हा’ खेळाडू तोडणार लाराचा 400 धावांचा विक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार क्रिकेटपटू यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) माझा कसोटीतील ४०० धावांचा विश्वविक्रम तोडेल असं विधान खुद्द ब्रायन लारा (Brian Lara) याने केलं आहे. माझ्या नाबाद 400 धावांच्या विक्रमासह त्याच्या यशाच्या जवळ कोणी असेल तर तो भारताचा 22 वर्षीय डावखुरा यशस्वी आहे असं म्हणत लाराने यशस्वीवर स्तुतीसुमने उधळली आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यशस्वीने आतापर्यंत फक्त नऊ कसोटी सामने खेळले आहेत आणि तरीही लाराला त्याच्याबद्दल मोठा आत्मविश्वास आहे.

मागील वर्षी आयपीएलदरम्यान लाराने यशस्वीसोबत बराच वेळ घालवला होता. मात्र आता आयपीएल 2023 पासून बरेच काही बदलले आहे आणि जयस्वाल आता भारताच्या कसोटी आणि T20 संघांचा एक महत्त्वाचा फलंदाज बनला आहे. त्याने क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याचा सध्याचा फॉर्म बघून लारा म्हणाला, ‘माझा रेकॉर्ड कोणापासून धोक्यात आहे असे मला वाटत असेल तर तो यशस्वी जयस्वाल आहे. त्याच्यात ती क्षमता आहे. यशस्वीने यापूर्वी कसोटीमध्ये दोन द्विशतके झळकावली आहेत. तो एक शानदार फलंदाज आहे. मला यशस्वीची एक गोष्ट आवडते ती म्हणजे तो खूप नम्र आहे आणि स्वतःवर काम करण्यास तयार असतो.

दरम्यान, डावखुरा यशस्वी जयस्वाल भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य फलंदाज बनला आहे. कर्णधार रोहित शर्मासोबत त्याने अनेकदा भारताला आक्रमक सुरुवात करून दिली आहे. सेहवाग प्रमाणेच यशस्वी कसोटी क्रिकेट मध्येही गोलंदाजांवर तुटून पडतो. आत्तापर्यंत अवघ्या ९ कसतो सामन्यात त्याने ७० च्या सरासरी धावा काढल्या आहेत. त्याने इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या घरच्या मालिकेत दोन द्विशतकांसह तीन शतके झळकावली. सामन्याच्या परिस्थितीनुसार आपल्या खेळात बदल करण्याची क्षमता जयस्वालमध्ये आहे.