कराडचे यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन रद्द ; कोरोनामुळे बाजार समितीचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । कराड शेती उत्त्पन्न बाजार समितीच्यावतीने दरवर्षी दि. 24 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत भरविले जाते. मात्र यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी व शेतकरी बांधवांच्या आरोग्य सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बाजार समितीने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

बाजार समितीकडून दरवर्षी येथे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशूपक्षी प्रदर्शन भरविले जाते. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात या प्रदर्शनाची लोकप्रियता आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकजयांच्या शेतीमालाची खरेदीविक्री होत होती. तसेच शेतीमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान, रसायने, किटकनाशके, जैविक व रासायनिक खते, पिकांच्या पध्दती, उत्पादन वाढविणारे प्रयोग आदींची माहिती शेतकऱ्यांना मिळत होती. शेती व शेतीपूरक उद्योगांची प्रेरणाही या प्रदर्शनातून मिळत होती.

सातारा जिल्ह्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून लाखो शेतकरी या प्रदर्शनाला भेट देत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळणे आणि आरोग्यविषयक खबरदारी घेणे महत्त्वाचे असल्याचे यंदाचे प्रदर्शन रद्द करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. दरवर्षी येणाजया स्टॉलधारकांनी, शेतकजयांनी, नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment