राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा कडेकोट लॉकडाऊन

यवतमाळ । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच यवतमाळ जिल्हा लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील १० दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे यवताळमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ पाहायला मिळत आहे. सोशल डिस्टनसिंग न पाळणे, लग्न समारंभ मध्ये झालेली गर्दी, मास्क न वापरणे, आधी नियम पायदळी तुडविल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही 28 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद या तीन ठिकाणी सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. रुग्णसंख्या वाढणाऱ्या तीन ठिकाणाहून प्रतिदिन प्रत्येकी 500 याप्रमाणे दिवसाला 1500 नमुन्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने मृत्यू होण्याची कारणे, याबाबत विश्लेषण करून डेथ ऑडीट रिपोर्ट अधिष्ठाता यांनी सादर करावा. सोबतच खाजगी रुग्णालय येथे कोरोनामुळे मृत्यू होण्याची कारणे याबाबत ऑडीट रिपोर्ट जिल्हा शल्य चिकित्सकांनी सादर करावे, असे निर्देश दिले आहेत. हाय -रिस्क, लो-रिस्कनुसार लॉकडाऊन राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

 

You might also like