कौटुंबिक वादातून प्राध्यापक पतीकडून बायकोची राहत्या घरी निर्घृणपणे हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका पतीने आपल्या पत्नीची राहत्या घरी चाकूने वार करून हत्या केली आहे. आरोपी पतीचे नाव मारोती अरके असे असून ते व्यवसायाने प्राध्यापक आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी पत्नीच्या हत्येप्रकरणी मारोती अरके याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विमल मारोती अरके असे या हल्ल्यात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?
यवतमाळ जिल्ह्यात आर्णी शहरातील स्वामी समर्थ नगर मध्ये रहिवासी असलेले प्राध्यापक मारोती आरके हे लोणी येथील राष्ट्रीय आश्रम उच्च माध्यमिक विद्यालयावर प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्यांना नियमित मध्यपानाचे व्यसन असल्याने ते घरी रोजच पत्नी विमल सोबत भांडण करायचे आणि तिला मारहाण करायचे. घटनेच्या दिवशीसुद्धा या दोघांमध्ये मोठे कडाक्याचे भांडण झाले होते.

हे भांडण एवढे विकोपाला गेले कि आरोपी प्राध्यापक मारोती आरके यांनी पत्नी विमल आरके हिच्या गुप्त अंगावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात विमल ही गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान विमलचा मृत्यू झाला. मृत विमलला आठ आणि पाच वर्षांची दोन लहान मुले आहेत. या हत्येनंतर आरोपीने स्वत: पोलीस स्टेशनला गुन्हा झाल्याचे सांगून आत्मसमर्पण केले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Comment