धक्कादायक! खिडकीचे गज कापून येरवडा कारागृहातील ५ कैदी फरार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । येरवडा कारागृहातील ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील ५ कैदी आज फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
कारागृहातील इमारतीच्या खिडकीचे गज कापून या कैद्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास पळ काढला आहे. अजिंक्य कांबळे, उत्तम कांबळे, सनी पिंटो, देवगण चव्हाण आणि अजिनाथ चव्हाण अशी फरार झालेल्या कैद्यांची नावं आहेत.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील काही कैद्यांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या इमारतीमध्ये हलवण्यात आले होते. यातील अजिंक्य कांबळे, उत्तम कांबळे, सनी पिंटो, देवगण चव्हाण आणि अजिनाथ चव्हाण हे ५ आरोपी मोक्याच्या गुन्ह्यातील आहेत.

दरम्यान, हे पाच जण इमारतीच्या खिडकीचा गज कापून मध्यरात्रीच्या सुमारास पळून गेले आहेत. ही घटना काही वेळेतच लक्षात येताच आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली असून, या पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे येरवडा पोलिसानी सांगितले.