नवी दिल्ली । रॅपर आणि सिंगर ‘यो यो हनी सिंह’ अर्थात हृदेश सिंह याच्याविरुद्ध त्याची पत्नी शालिनी तलवारने घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. हनी सिंगच्या पत्नीने दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात हा खटला दाखल केला आहे. शालिनीने तिच्या पतीवर शारीरिक आणि मानसिक हिंसाचाराचा आरोप केला आहे. शालिनीने आज न्यायालयात तिचा खटला दाखल केला आहे. न्यायालयाने हनी सिंगला 28 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याची नोटीस बजावली आहे.
हनी सिंह आणि शालिनी यांचे लग्न 2011 मध्ये दिल्लीतील गुरुद्वारामध्ये झाले होते. पत्नीने दाखल केलेल्या खटल्यात असे म्हटले आहे की,”तिला मारहाण केली जात आहे आणि मानसिक शोषणही केले जात आहे.”