हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yoga For Weight Loss – आजच्या धावपळीच्या जगात आपण स्वतःकडे आणि शरीराकडे फार कमी लक्ष देतोय. त्यामुळे अनेक शारिरीक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. कित्येक लोकांचा योग्य आहार , व्यायाम नसल्यामुळे वजन खूप वाढते, आणि ते नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधे खाऊ लागतात . पण आम्ही तुम्हाला असे काही योगासने सांगणार आहोत , ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या औषधाची गरज भासणार नाही. पुढील पाच योगासनांमुळे तुम्ही तुमचे वजन आणि मानसिक ताण कमी करू शकाल.
सूर्य नमस्कार (Yoga For Weight Loss)–
अनेक तज्ञ् वजन कमी करण्यासाठी सूर्य नमस्कार (Surya Namaskar) करण्याचा नेहमी सल्ला देतात. हे योगासन सर्व भागांना सक्रिय करण्यास आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतो. यात 12 आसनांचा एक क्रम असतो, जो शरीराच्या चरबीला कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. हे आसन पचन तंत्राला बळकट करतो आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढतो. त्यामुळे तुम्ही जर रोज हे आसन केले तर तुम्ही वजन नियंत्रणात आणू शकाल.
त्रिकोणासन –
दुसरे सर्वात महत्वाचे योगासन (Yoga For Weight Loss) म्हणजे त्रिकोणासन (Trikonasana) होय. त्रिकोणासनालाच त्रिकोण मुद्रा असेही म्हणतात. हे योगासन संतुलन आणि कॅलोरी बर्न करण्यासाठी खूप महत्वाचे मानले जाते. हे दररोज केल्यामुळे अनेक फायदे होतात. त्यामुळे तुमचे पोट, कंबर आणि चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्याचसोबत पचन तंत्र मजबूत करण्यासाठी देखील मदत करते. या आसनामुळे शरीराचा आकार आकर्षक होतो.
पर्वतासन –
पर्वतासन ((Parvatasana)) किंवा पर्वत मुद्रा एक साधे, पण प्रभावी आसन आहे, जे वजन कमी करण्यासाठी मदत करते . हे आसन पोटाच्या स्नायूंना बळकट करते आणि पचन क्रियेला सुधारते. पर्वतासन केल्याने शरीराच्या अतिरिक्त चरबीचा भाग कमी होतो आणि पाठीची हाडे मजबूत होतात. तसेच, हे आसन तणाव कमी करण्यात आणि मनाला शांत करण्यासाठीही उपयुक्त आहे.
भुजंगासन (Yoga For Weight Loss)–
भुजंगासन किंवा कोब्रा पोज (Bhujangasana) पोटातील चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे आसन पोटाच्या स्नायूंना ताण देऊन पचन तंत्र सक्रिय करते. नियमित भुजंगासन केल्याने शरीरातील मेटाबोलिझम वाढतो आणि कॅलोरी जलद बर्न होतात. तसेच, हे आसन पाठीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यास मदत करते आणि हाडे लवचिक बनवण्यास फायदेशीर ठरते.
धनुरासन –
धनुरासन (Dhanurasana) किंवा धनुष मुद्रा हे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी (Yoga For Weight Loss) करण्यासाठी एक उत्कृष्ट आसन आहे. हे आसन पोट, जांघ आणि कंबरेच्या स्नायूंना बळकट करते. तसेच, हे पचन तंत्र सुधारते आणि शरीराचा मेटाबोलिझम वाढवतो. धनुरासन केल्याने शरीरातील तणाव कमी होतो आणि शरीराला अधिक उत्साही बनवते. योगासने वजन कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी आहेत. यामुळे शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक शांति देखील मिळवता येते. योग्य आहार आणि व्यायामाबरोबर योगाभ्यास केल्यास लवकरच सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात.