हॅलो महाराष्ट ऑनलाईन । भारताचे माजी क्रिकेटपटू आणि युवराज सिंहचे वडील योगराज सिंह (Yograj Singh) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. खास करून महेंद्रसिंह धोनीवर ते नेहमी टीका करत असतात. मागील आठवड्यात तर त्यांनी धोनीसह कपी देववर सुद्धा सडकून टीका केली होती. याच दरम्यान युवराच एक जुना व्हिएओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो म्हणतोय कि माझ्या वडिलांना काही मेंटल इशू आहे.
काय आहे व्हायरल विडिओ मध्ये?
रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना युवराज म्हणाला होता कि, “मला वाटते माझ्या वडिलांना मानसिक समस्या आहे आणि ते ते मान्य करू इच्छित नाहीत. मला असे वाटते की त्यांना काहीतरी करण्याची गरज आहे. जसे मी कबूल करतो की मला थेरपीची गरज आहे. होय. त्यांना वाटते की ते बरोबर आहेत पण आम्ही आणि तुम्ही त्यांची समस्या बदलू शकत नाही. युवराजचा वडिलांबद्दलचा व्हिडिओ अशावेळी व्हायरल झाला आहे जेव्हा त्यांनी नुकतंच धोनीवर सडकून टीका केली.
My Father has mental issues : Yuvraj #MSDhoni pic.twitter.com/KpSSd4vDzA
— Chakri Dhoni (@ChakriDhonii) September 2, 2024
धोनीबद्दल काय बोलले योगराज सिंह?
‘मी महेंद्रसिंह धोनीला माफ करणार नाही. त्याने त्याचा चेहरा आरशात बघावा, तो भलेही खूप मोठा क्रिकेटर असेल , पण त्याने माझ्या मुलाविरुद्ध काय केले हे आता समोर येत आहे. धोनीला आयुष्यात कधीच माफ केलं जाऊ शकत नाही मी आयुष्यात कधीच दोन गोष्टी केल्या नाहीत, पहिली, ज्याने माझ्यावर अन्याय केला असेल त्याला मी कधीच माफ केले नाही आणि दुसरी, मी आयुष्यात त्यांना कधीच स्वीकारले नाही, मग ते माझे कुटुंबीय असो किंवा माझी मुले असं म्हणत योगराज सिंह यांनी धोनीबद्दल आपला संताप व्यक्त केला. तसेच कर्करोगाने त्रस्त असतानाही युवराजने देशासाठी विश्वचषक जिंकला. यासाठी त्यांना भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे अशी मागणी सुद्धा योगराज सिंह यांनी केली .
दरम्यान, योगराज सिंह यांनी कितीही काही म्हंटल तरी युवराज आणि धोनीची दोस्ती संपूर्ण जगाला माहित आहे. दोघांनी संघ अडचणीत असतां अनेकदा मधल्या फळीत दमदार पार्टनरशिप केली आहे. एकेकाळी भारतीय क्रिकेट मध्ये युवी- माही जोडी चांगलीच प्रसिद्ध होती. धोनीच्या नेतृत्वाखालीच 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 वनडे विश्वचषक स्पर्धेत युवराजने सर्वोत्तम कामगिरी केली, ज्यामुळे भारतीय संघ चॅम्पियन बनला. तसेच धोनीच्या नेतृत्वातच युवराजची खेळी आणखी बहरली हे सुद्धा कोणीही नाकारू शकत नाही.