नवी दिल्ली । जर तुमच्याकडेही 500 रुपयांची ही जुनी नोट असेल तर तुम्ही घरबसल्या कमाई करू शकाल. जरी पाचशे रुपयांची ही नोट भारत सरकारने चार वर्षांपूर्वीच बंद केलेली असली तरी आजही बाजारात त्याची किंमत हजारो रुपये आहे. या नोटेचा ऑनलाइन लिलाव करून तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकता.
500 रुपयांची ही जुनी नोट बदलण्यापूर्वी तुम्हाला काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. चला तर मग ‘या’ नोटेची खासियत काय असावी आणि तुम्ही ती कुठे विकू शकाल हे जाणून घेऊयात…
भारतात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडे नोटा छापण्याचे काम सोपवण्यात आले आहे आणि RBI अतिशय काळजीपूर्वक चलनी नोटा छापते. जो नमुना निश्चित केला आहे त्यानुसारच नोटा छापल्या जातात. त्यामुळे सर्व नोटा दिसायला सारख्याच असतात. मात्र छपाईच्या वेळी जर नोटेमध्ये काही चूक झाली आणि ती बाजारात आली तर ती नोट खास बनते. या नोटा कितीतरी पटीने विकत घेण्यासाठी लोकं तयार होतात.
‘या’ सीरियल नंबरची नोट असावी
तुमच्याकडे 500 रुपयांची जुनी नोट असेल तर तिचा सीरियल नंबर दोनदा छापला गेला आहे का ते लगेच तपासा. तसे असल्यास, तुम्हाला या नोटेचे 5,000 रुपये मिळू शकतील. याशिवाय 500 रुपयांच्या नोटेचा एक कॉर्नर मोठा असेल, म्हणजेच त्यावर अतिरिक्त कागद सोडला गेला असेल तर त्या नोटेच्या बदल्यात तुम्हाला 10,000 रुपये मिळू शकतील.
ऑनलाइन लिलाव कसा करायचा?
– http://oldindiancoins.com या वेबसाइटवर जा.
– वेबसाइटवर विक्रेता म्हणून स्वतःचे रजिस्ट्रेशन करा.
– रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या 500 रुपयांच्या नोटेचा फोटो वेबसाइटवर अपलोड करा.
– इच्छुक खरेदीदार तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकाल.