जर तुम्हालाही FD घ्यायची तर सर्वात जास्त व्याज कोठे मिळेल हे जाणून घ्या, त्यासाठीची संपूर्ण लिस्ट पहा

PMSBY
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही बँकेत फिक्स्ड डिपॉझिट- FD करू शकता. FD हा गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी बहुतेक गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त व्याज मिळावे अशी अपेक्षा असते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक अशा पर्यायांचा शोध घेतात जिथे जास्तीत जास्त व्याज उपलब्ध असेल आणि त्यांचे पैसे सुरक्षित असतील. येथे आम्ही तुम्हाला खासगी क्षेत्रातील बँकांबद्दल सांगत आहोत जिथे FD वर सर्वाधिक व्याज मिळत आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या एक वर्षात रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. ते आता 4 टक्क्यांच्या जवळपास आहे. यामुळे बहुतेक बँकांनी FD चे दर कमी केले. FD वर मिळणारे व्याज करपात्र आहे, त्यामुळे FD वर रिटर्नचा फायदा कमी होतो.

बँकांचे व्याजदर जाणून घ्या
जर तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर येथे 10 खाजगी बँका आहेत ज्या अधिक व्याज देत आहेत. हे दर एक कोटी रुपयांच्या खाली असलेल्या FD चे व्याजदर आणि पाच वर्षांचा कालावधी आहेत. ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉइंट अधिक व्याज मिळते.

या बँक देत आहेत इतके व्याज
1 DBS बँक-5.70-6.50 टक्के
2 Indusland बँक-5.50-6.50 टक्के
3 RBL बँक-5.40-6.50 टक्के
4 येस बँक-5.25-6.50 टक्के
5 TNSC बँक-5.75-6.00 टक्के
6 IDFS First बँक-5.25-6.00 टक्के
7 करूर वैश्य बँक-4.25-6.00 टक्के
8 एक्सिस बँक-4.40-5.75 टक्के
9 साउथ इंडियन बँक-4.50-5.65 टक्के

FD खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
<< FD कालावधी
<< व्याज दर
<< कर
<< व्याज काढणे