हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतामध्ये सोने खूप जास्त प्रमाणात खरेदी केले जाते. अगदी सणासुदीच्या काळात किंवा लग्न समारंभासाठी असो सोने खूप जास्त प्रमाणात लोक खरेदी करतात. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्यामुळे अगदी दहा ग्राम सोने खरेदी करायचे असले, तरी सर्वसामान्यांना ते जमत नाही. म्हणजेच तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकत नाही, असा होत नाही. आता ज्यांना सोने खरेदी करायचे आहे, त्यांच्यासाठी यूपीआय मधील आता कंपनी फोन पेने अल्पबचत प्लॅटफॉर्म Jar सोबत एक नवीन योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला रोज बचत करता येईल. यासाठी तुम्हाला रोज 24 कॅरेट सोन्यात गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे या नवीन योजनेत ग्राहक प्रत्येक दिवशी कमीत कमी 10 रुपये आणि जास्तीत जास्त 5 हजार रुपये गुंतवणूक करू शकत आहे. त्यामुळे हळूहळू तुमची एक मोठी रक्कम तयार होईल आणि तुम्ही 24 कॅरेट सोने खरेदी करू शकता. यामुळे तुम्हाला बचतीची सवय देखील लागेल आणि तुम्हाला चांगला परतावा मिळेल.
डेली सेविंग हे उत्पादन 400 गिल्ड टेक सोल्युशनच्या मदतीने ऑपरेट करता येईल. यासाठी गुंतवणूकदार केवळ 25 सेकंदात डिजिटल बोर्ड मध्ये गुंतवणूक करू शकतील. गेल्या काही दिवसांपासून मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे आता फोन पेने छोट्या गुंतवणूकदारांसाठी ही एक नवीन गुंतवणुकीची योजना आणलेली आहे. त्यासाठी प्रभावी मंत्र देखील दिला आहे. तुम्ही अल्पबचत करून यात खूप मोठी गुंतवणूक देखील करू शकता.
आज काल सगळ्या गोष्टींचा विचार केला तर अनेक लोक हे डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करत आहे. त्यामुळे आता या कंपनीने जार सोबतने एक नवीन पाऊल टाकलेले आहे. या माध्यमातून तुम्ही फोन पेचा 560 दशलक्ष म्हणून अधिक युजरसाठी डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. ही गुंतवणूक अगदी सोपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सुरक्षित आह. यामध्ये केलेली गुंतवणूक ग्राहक त्यांच्या नियमाने अटीनुसार काढू शकतात. यामध्ये तुम्हाला दिवसाला कमीत कमी10 रुपये जास्तीत जास्त 5 हजार रुपये गुंतवणूक करता येईल.