UPI Lite च्या ट्रांजेक्शनच्या मर्यादेत वाढ; इंटरनेटशिवाय पेमेंट करणे होणार शक्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल पेमेंटला अधिक सुलभ बनवण्यासाठी UPI Lite च्या ट्रांजेक्शन अमाऊंटची मर्यादा वाढवली आहे. यामुळे ग्राहकांना एका वेळेस 1000 रुपयांपर्यंतचे ट्रांजेक्शन करता येणार आहे. तसेच त्यांनी वॉलेटची एकूण मर्यादा 5000 रुपये करून , हा निर्णय त्वरित लागू केला आहे. UPI Lite चा वापर प्रामुख्याने लहान ट्रांजेक्शन आणि कमी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणाऱ्यांसाठी करण्यात आला आहे. तर चला पाहुयात इंटरनेटशिवाय सहज पेमेंट कसे करता येणार आहे.

इंटरनेटशिवाय सहज पेमेंट करता येणार

UPI Lite म्हणजे Unified Payments Interface होय . UPI Lite ही सुविधा इंटरनेटशिवाय लहान रक्कम डिजिटल पेमेंट करण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे कमी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणीही सहज पेमेंट करता येते. या प्रणालीत रिअल-टाइम अलर्ट येत नसल्यामुळे SMS नोटिफिकेशन्स कमी होतात, ज्यामुळे मोबाईलमध्ये वारंवार त्रास होत नाही. तसेच UPI Lite सुरक्षित असून वेगवान पेमेंटसाठी अतिरिक्त ऑथेंटिकेशनची गरज नसते, त्यामुळे दैनंदिन व्यवहार अधिक सोपे आणि जलद होतात.

RBI चा नवीन नियम

RBI ने UPI Lite च्या मर्यादांमध्ये सुधारणा केली आहे. आता एका ट्रांजेक्शनसाठी 1000 पर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली आहे, जी पूर्वी 500 होती. तसेच वॉलेटची एकूण मर्यादा 2000 वरून 5000 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे किराणा सामान खरेदी, बस ऑटोचे भाडे देणे किंवा छोट्या बिलांची पेमेंट करणे अधिक सोयीचे झाले आहे. यामुळे लोकांच्या कामत गती मिळाली आहे.

ग्रामीण भागातील लोकांना फायदा

UPI Lite ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जास्त फायदेशीर ठरत आहे. कमी नेटवर्क असलेल्या भागांमध्येही पेमेंट करणे आता शक्य झाले आहे. हा निर्णय डिजिटल पेमेंट्सला अधिक चालना देऊन भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यास मदत करेल. या सुविधेमुळे डिजिटल व्यवहार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील आणि भारताच्या डिजिटल इंडिया मोहिमेला पाठिंबा मिळणार आहे.