हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीयांसाठी आधार कार्ड (Adhar Card) हे अत्यंत महत्त्वाचे असे कागदपत्र आहे. आधार कार्डचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये केला जातो. हे आपले ओळखीचे एक महत्त्वाचे असे कागदपत्र असते. कोणत्याही सरकारी कामांसाठी आधार कार्ड आवश्यक झालेले आहे. एवढंच नाही तर पैशांच्या व्यवहारासाठी देखील आधार कार्ड खूप महत्त्वाचे असते. शैक्षणिक कामात देखील आधार कार्डला खूप महत्त्व आहे. आता तुम्ही या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँकेतून पैसे देखील काढू शकता. आधार इन वर्ल्ड पेमेंट सिस्टीमच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बँक खात्यातून पैसे काढू शकता जमा करू शकता. किंवा दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर देखील करू शकता. आज काल सगळेच आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीने व्हायला लागलेले आहेत. आणि हे व्यवहार आधार कार्डच्या माध्यमातून अत्यंत सोपे आणि सुरक्षित होण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ही नवीन प्रणाली विकसित केलेली आहे.
आधार युनिफाईड पेमेंट इंटरफेसवर हे आधारित आहे ही एक बँक आधारित मॉडेल आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे केवळ आधार कार्ड आणि फिंगर प्रिंट यांच्याद्वारे व्यवहार करता येतो. बँकेचे कोणतेही व्यवहार करण्यासाठी तुम्हाला बँक डिटेल्सची गरज लागत नाही. कोणताही ओटीपीची देखील गरज लागत नाही. केवळ तुमच्या आधार कार्ड जर बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्ही या प्रणालीद्वारे कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकता.
AePS मिळणाऱ्या सुविधा
AePS द्वारे तुम्ही तुमच्या खात्यातील बॅलन्स देखील चेक करू शकता. तसेच तुम्हाला तुमच्या खात्यातून शेत पैसे देखील काढता येतात. तसेच पैसे जमा देखील करता येतात. तुम्ही तुमच्या आधार क्रमांकाच्या माध्यमातून तुमच्या खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. तसेच आधार बेस्ट सिस्टिम द्वारे देखील तुम्हाला व्यवहार करता येतात यासाठी तुम्हाला तुमच्या बँक डिटेल्सची गरज नाही. केवळ तुमच्या आधार कार्ड तुमच्यासोबत असले, तरी सगळे आर्थिक व्यवहार होतील. परंतु यासाठी तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याला लिंक असणे खूप गरजेचे आहे.
AePS द्वारे व्यवहार कसा करावा ?
एईपीएस द्वारे व्यापार करण्यासाठी तुम्हाला बँकिंग प्रतिनिधी किंवा कॉमन सर्विस सेंटरच्या ऑपरेटेडकडे जावे लागेल. त्यानंतर तुम्ही डिजिटल व्यवहारांसाठी बँकेकडून बँक करत असताना जबाबदारी दिली जाते. त्यानंतर तुम्हाला या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो. ग्राहक बँकेत न जाता घरबसल्या बँकेच्या सेवांचा लाभ घेऊ शकता. डिजिटलायजेशनच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.