घरबसल्या हे जॉब करून महिन्याला कमवू शकता 50 हजार रुपये; वाचा सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल शिक्षणाला खूप जास्त महत्त्व आहे. परंतु तुमच्या शिक्षणाला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व तुमच्यामधील असलेल्या कलेला आणि कौशल्याला देखील आहे. तुम्ही जर इतर काही गोष्टी शिकून घेतल्या, तर तुम्हाला अगदी घरबसल्या जगभरातील मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून काम करता येते. आणि तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता असणे तर गरजेचे आहेच. परंतु त्यासोबत काही कौशल्य असणे देखील गरजेचे आहे . सध्या सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक जॉब्स आहेत. जे तुम्ही तुमच्या कौशल्याच्या आधारावर मिळू शकतात. अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या उमेदवारांना अगदी घरी बसून काम उपलब्ध करून देतात. आणि चांगले पॅकेज देखील देतात. आता हे असे कोणते जॉब आहे? जे तुम्ही घरी बसून करू शकता. आणि महिन्याला चांगला इन्कम देखील घेऊ शकता हे आपण जाणून घेणार आहोत.

सॉफ्टवेअर डेव्हलपर

सध्या सॉफ्टवेअर डेव्हलपरची खूप जास्त मागणी आहे. एखाद्या एप्लीकेशन डिझाईन करणे, त्याचप्रमाणे कोडींग करण्यात देखील जे लोक एक्सपर्ट आहेत. त्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपरची नोकरी खूप फायद्याची ठरते. या जॉब साठी तुम्हाला कोडींगची माहिती असणे गरजेचे असते. तुम्हाला जर कोडींगची माहिती असेल तर तुम्हाला घरबसल्या सहज नोकरी मिळेल.

डिजिटल मार्केटिंग स्पेशालिस्ट

सध्या डिजिटल मार्केटिंग हे एक मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे. तुम्हाला विविध क्षेत्रात घरी बसून जाहिराती आणि प्रचार करता येतो. यासाठी संपूर्ण प्लॅनिंग असावे लागते. हा व्यक्ती ई-मेल कॅम्पेन त्याचप्रमाणे सोशल मीडिया, वेबसाईट यांसारख्या सगळ्या गोष्टींवर काम करतात. त्यामुळे तुम्ही जर डिजिटल स्पेशालिस्ट असाल, तर तुम्ही अगदी घरी बसून चांगले पैसे कमवू शकता.

ग्राफिक डिझायनर

सध्या ग्राफिक डिझायनरला खूप जास्त मागणी आलेली आहे. अनेकवेळा आपण आपल्या व्यवसायाची किंवा इतर कुठल्याही गोष्टीची जाहिरात ही सोशल मीडियावर करतो. त्यासाठी लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ग्राफिक्स डिझाईन करणे खूप गरजेचे असते. यामध्ये विविध प्रकारचे लोगो, ब्राउझर्स, पोस्टर डिजिटल ग्राफिक्स करतात. वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट उपलब्ध करून तुम्ही चांगल्या प्रकारे ग्राफिक करू शकता. तुम्ही जर ग्राफिक डिझाईन असाल, तर तुम्हाला घरबसल्या खूप चांगली कमाई करता येईल.

प्रोजेक्ट मॅनेजर

प्रोजेक्ट मॅनेजरवर विविध प्रकल्पाचे काम व्यवस्थित पाहणे कामावर नियंत्रण ठेवणे आणि एखादा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी असते. या मॅनेजरच्या हाताखाली एक संपूर्ण टीम काम करत असते. परंतु त्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजरकडे उत्तम संवाद कौशल्य, नियोजन कौशल्य हे गुण असणे गरजेचे आहे.

वर्चुअल असिस्टंट

वर्चुअल असिस्टंट हा एक ऑनलाईन सहाय्यक असतो. जो ईमेल मॅनेजमेंट आणि कागदपत्र या सगळ्या गोष्टींची तयारी करत असतो. आणि जबाबदारी सांभाळत असतो. तुम्ही इंटरनेटचा वापर करून अगदी घरबसल्या ही नोकरी करू शकता.

ऑनलाइन टीचर

आजकाल ऑनलाईन टीचिंग मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अनेक लोक हे घरी बसूनच क्लासेस घेतात. अशा प्रकारे तुमच्याकडे जर चांगले शिकवण्याचे कौशल्य असेल, तर तुम्ही घरी बसून विद्यार्थ्यांची संवाद साधू शकता आणि त्यांना ज्ञान देऊ शकता.

वेब डिझायनर

वेब डिझायनर हा वेगवेगळ्या प्रकारचे वेबसाईट डिझाईन करण्याचे काम करत असतो. वेबसाईटची पूर्ण रचना त्याचप्रमाणे वेबसाईटचा कलर या सगळ्या गोष्टी तो घर बसून पाहू शकतो. अशा प्रकारे तुम्ही हा जॉब मिळून देखील घरबसल्या चांगला पैसा कमवू शकता.

कंटेंट रायटर

आजकाल विविध वेबसाईट, ब्लॉग, सोशल मीडिया पोस्टसाठी चांगली माहिती लिहिण्याच्या कामासाठी कंटेंट राईटरची गरज असते. यामध्ये तुमच्याकडे जर लेखन कौशल्य असेल तसेच विविध विषयांची चांगली जाण असेल, तर तुम्ही अशा परिस्थितीत घरबसल्या चांगला जॉब मिळवू शकता.