हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेत तर प्रत्येकाचे खाते असतेच. परंतु या खात्यांबाबत काही नियमांचे पालन सुद्धा करावे लागते. यातली सरावात महत्वाचा नियम म्हणजे मिनिमम बॅलेन्स. म्हणजेच काय तर तुमच्या बँक खात्यात कमीत कमी ५०० किंवा १००० रुपये तरी असावे. परंतु आजकाल वाढती महागाई, आर्थिक तंगी आणि बँकेचे हप्ते EMI मुळे अनेकांचे खाते पगाराच्या काही दिवसांतच मोकळं होत. अशावेळी समजा अचानकपणे पैशाची गरज लागली तर आपल्याला मित्रांना किंवा नातेवाईकांना विनंती करायला लागते. परंतु आता हि चिंता मिटणार आहे. कारण बँकेत पैसे नसतानाही तुम्ही तब्बल १०००० रुपये काढू शकता. होय, वाचायला जरी विश्वास न बसणारं वाटत असलं तरी हे खरं आहे.
कोण काढू शकते 10 हजार रुपये?
तर मित्रानो, याचा लाभ त्या लोकांना मिळतोय ज्यांनी प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत झिरो बॅलन्स मध्ये अकाउंट ओपन केलेले आहेत. या योजनेत ज्यांचे बँक खाते आहे ते ग्राहक शून्य-बॅलन्स खात्यांमधून 10000 रुपयेपर्यंत ओव्हरड्राफ्ट देखील मिळवू शकतात. ओव्हरड्राफ्ट म्हणजे तुमच्या बँक खात्यात पैसे नसले किंवा शिल्लक शून्य असली तरीही तुम्ही बँकेतून काही पैसे काढू शकता. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत बँक खात्यातून पैसे काढता येतात. नंतर जेव्हा तुमच्या खात्यात पैसे येतील तेव्हा बँक तुमच्याकडून त्याची परतफेड करून घेते. महत्वाचा फायदा म्हणजे जेव्हा तुम्हाला आर्थिक गरज असते तेव्हा हे पैसे तुमच्यासाठी आधार ठरू शकतात. आणखी एक गोष्ट म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत बँक खात्याशी संबंधित RuPay डेबिट कार्डवर 2 लाखांपर्यंतचा अपघात विमा देखील दिला जातो. या सुविधेमुळे बँकेत पैसे नसले तरीसुद्धा ग्राहकांना दहा हजार रुपये काढता येऊ शकतात आणि म्हणूनच या सुविधेचे सर्वसामान्य ग्राहकांमधून कौतुक केलं जात आहे.
तुम्हाला जनधन योजनेच्या अकाउंट साठी ओव्हरड्राफ्ट सुविधा सुरू करायची असेल तर याकरिता तुम्हाला बँकेत जाऊन एक साधा अर्ज करावा लागणार आहे. मात्र, तुमचा बँकेतील व्यवहार चांगला असेल तेव्हाच बँक या सुविधेला मान्यता देईल हे सुद्धा याठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बाकी, गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी प्रधानमंत्री जनधन योजना जणू वरदान ठरली होती. खास करून कोरोनाच्या काळात जेव्हा संपूर्ण देशात लॉकडाउनची परिस्थिती होती त्यावेळी प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत लोकांना दर महिन्याला ५०० रुपयांची मदत करण्यात आली होती.




