निरोगी राहण्यासाठी या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आरोग्यमंत्रा । निरोगी राहणे कोणाला आवडत नाही. सर्वांनाच निरोगी रहावेसे वाटते. मात्र धकाधकीच्या आयुष्यात निरोगी राहण्याचे सूत्र आपण तंतोतंत पाळू शकत नाही. तरी देखील निरोगी राहण्यासाठी आपण साधे आणि सोपे उपाय मात्र नक्कीच करू शकतो. नेमके ते उपाय तरी कोणते आहेत हे पाहणे देखील महत्वाचे ठरते ते आपण पुढील प्रमाणे पाहूया

फळांचा आणि हिरव्या पाले भाज्यांचा आहारात समावेश करणे

रोजच्या आहारात एकादी हिरवी पालेभाजी आणि एकाद्या फळाचा समावेश असणे गरजेचे असते. ज्या मार्फत शरीराला आवश्यक असणारी पोषण मुल्ये नियमित शरीराला मिळत रहतात. त्यामुळे आहारात पालेभाज्यांचा आणि फळांचा समावेश असणे आवश्यक असते. म्हणून आपल्याला निरोगी आयुष्य जगायचे असेल तर हिरव्या पालेभाज्यांचा आणि फळाचा आपल्या आहारात समावेश करणे आवश्यक असणार आहे.

आवश्यकते नुसार पाणी पिणे

शरीरात दिवसाला किमान २ लिटर पाणी जाने आवश्यक असते. त्यामुळे आपण दिवसात नियमित पाणी पिणे गरजेचे असते. आपण शरीराला आवश्यक असणारे पाणी जर पिलो नाही तर आपल्याला पोटाचे विकार होण्याची शक्यता असते.

मानसिक स्वास्थ व्यवस्थित ठेवणे

माणसाचे मन आणि मनगट नेहमी मजबूत असले पाहिजे असे बोलले जाते. त्याच उक्तीला साजेसे आपले मानसिक स्वस्थ असणे गरजेचे असते. आपले आपल्या नाते संबधातील व्यक्तीशी कसलेच कलह नसावे जेणेकरून मानसिक स्वस्थ व्यवस्थित राहील. त्याच प्रमाणे एकाद्या गोष्टीचा आपण ताण घेता कामा नये जेणेकरून आपण निरोगी आयुष्य जगू शकाल.

नियमित व्यायाम करणे

माणसाच्या शरीराला आहारा एवढीच गरज नियमित व्यायामाची असते. व्यायाम केल्याने माणसाचे शरीर पिळदार राहते. तसेच व्यायामाने कसलेले शरीर सहसा कोणत्या आजाराला लवकर बळी पडत नाही. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी व्यायामाचे महत्व खूप मोठे आहे.

Leave a Comment