इटलीच्या ‘या’ शहरात स्थायिक होण्यासाठी आपल्याला मिळतील 24.76 लाख रुपये, मात्र ‘या’ अटी मान्य कराव्या लागणार*

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इटली । सुंदर देश इटली वृद्धत्व आणि कमी लोकसंख्येशी झुंज देत आहे. येथील कॅलब्रिया प्रदेशातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. म्हणूनच सरकारने इतर देशातील लोकांना येथे स्थायिक होण्याची विशेष ऑफर दिली आहे. या शहरात स्थायिक होण्यासाठी सरकार 28 हजार युरो म्हणजेच सुमारे 24.76 लाख रुपये देईल. तथापि, येथे स्थायिक होण्यासाठी काही अटी पाळाव्या लागतील.

metro.co.uk या वृत्तानुसार, इटलीमधील कॅलाब्रिया प्रदेशात स्थायिक होण्यासाठी वयोमर्यादा निश्चित केली गेली आहे. यासाठी अर्ज करणाऱ्यांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असावे. कमी लोकसंख्येच्या समस्येला तोंड देणार्‍या कॅलाब्रिया प्रदेशातील (Calabria Region) अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांना नवीन व्यवसाय सुरू करावा लागेल. ज्यांना येथे शिफ्ट व्हायचं आहे त्यांना त्यांच्या अर्जाच्या 90 दिवसांच्या आत हे करावं लागेल.

अहवालानुसार या ऑफरसाठी अर्जाची प्रक्रिया काही आठवड्यांत कॅलाब्रिया प्रदेशच्या वेबसाइटवर सुरू केली जाऊ शकते. या व्यतिरिक्त, अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाइटवर देखील तपासू शकता.

इटलीचा कॅलाब्रिया प्रदेश कमी लोकसंख्येच्या समस्येशी लढत आहे आणि सध्या या प्रदेशातील 75 टक्के पेक्षा जास्त शहरांमध्ये 5000 पेक्षा कमी लोकं आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये, इटलीमधील अनेक शहरांना कमी लोकसंख्येच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यावर्षी इटलीच्या बॅसिलिकाटा प्रदेशातील लोरेन्झाना शहरात 1 युरोला घर विकले जात होते.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment