रविवार असल्यामुळे ‘या’ वर्षी चार सुट्ट्या वाया जाणार, सुट्ट्यांची लिस्ट तपासा आणि प्लॅनिंग करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । काही दिवसांनी तुम्ही जुन्या वर्षातून नवीन वर्षात जाल. नवीन वर्षात, लोकं अनेक नवीन ठिकाणांना भेट देण्याचे प्लॅनिंग करतात. जर तुम्हीही काही प्लॅन करत असाल तर एकदा सुट्ट्यांची लिस्ट नक्की पहा. यावेळी तुम्ही चार सुट्या गमावाल. कारण यावेळी चार सरकारी सुट्ट्या रविवारी येत आहेत. चला तर मग यंदाच्या सुट्ट्यांवर एक नजर टाकूयात…

केंद्र सरकारकडून सुट्ट्यांची लिस्ट जाहीर
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांची लिस्ट केंद्र सरकारने जारी केली आहे. यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, ख्रिसमस डे अशा 14 सुट्ट्या मिळणार आहेत. याशिवाय पर्यायी 14 सुट्ट्यांच्या लिस्टमध्ये तीन निवडण्याचा पर्यायही केंद्रीय कर्मचाऱ्यांकडे असेल. मात्र, यावेळी होळी आणि रामनवमी या ऐच्छिक सुट्ट्यांच्या लिस्टमध्ये टाकण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, बकरी ईद (10 जुलै), गांधी जयंती (2 ऑक्टोबर), ईद-ए-मिलाद (9 ऑक्टोबर) आणि ख्रिसमस (25 डिसेंबर) रविवारीच येतील.

मार्च, एप्रिलमध्ये मोठी सुट्टी
नवीन वर्षात तुम्ही मार्च महिन्यात लाँग वीकेंड प्लॅन करू शकता. 18 मार्चला होळी आहे, पुढचे दोन दिवस शनिवार-रविवार आहेत. याशिवाय एप्रिलच्या मध्यातही अशीच संधी निर्माण होत आहे. 14 एप्रिल ही महावीर जयंती/बैसाखी/डॉ.आंबेडकर जयंती आहे. 15 एप्रिलला गुड फ्रायडे आणि नंतर शनिवार-रविवार पडतो. 30 एप्रिल – 1 मे हा वीकेंड आहे, त्यानंतर 2 मे रोजी सुट्टी घेतली तर 3 मे रोजी ईद येते. 14-15 मे वीकेंड आणि 16 मे बुद्ध पौर्णिमा आहे.

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मोठे प्लॅनिंगही करता येईल
6-7 ऑगस्ट रोजी शनिवार-रविवार आहे, त्यानंतर 8 ऑगस्ट रोजी मोहरमची सुट्टी असेल. 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. शुक्रवारी सुट्टी घेतली तर पुढचे दोन दिवस वीकेंड असेल. त्यानंतर सोमवारी स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असते आणि 16 ऑगस्टला पारशी नववर्षाची सुट्टी असते. 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. जर गुरुवार आणि शुक्रवारची सुट्टी घेतली तर तुम्ही 2 आणि 3 सप्टेंबरला वीकेंडची सुट्टी घेऊ शकता. याशिवाय सप्टेंबरमध्येही संधी आहे. 8 सप्टेंबर रोजी ओणम आहे. 9 सप्टेंबर रोजी रजा घेतल्याने 10-11 शनिवार-रविवार रोजी पडेल. त्यामुळे या महिन्यात तुम्ही कुठेतरी फिरण्याचा प्लॅन करू शकता.

Leave a Comment