दोन जिवलग मित्रांनी ‘या’ कारणामुळे केली आत्महत्या सुसाईट नोट वाचून व्हाल थक्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | पिंप्री येथील दोन मित्रानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. ‘आईवडिलांचा अपमान सहन होणार नाही’ असं म्हणत त्यांनी व्हाट्सअप स्टेटस सुसाईड नोट म्हणून ठेवत आत्महत्या केली. योगेश सुधाकर खिस्ते (23) आणि ज्ञानेश्वर गणेश शिरसाट (20) असे मृतांची नावे आहेत. त्यांनी स्टेटसला ठेवलेल्या सुसाईड नोटवरून शेख मोईन, शेख मुश्ताक आणि एक महिला यांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री योगेश सुधाकर खिस्ते आणि त्याचा मित्र ज्ञानेश्वर गणेश शिरसाट यांनी आम्ही आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट व्हाट्सअँप स्टेट्सवर ठेवली होती. हे स्टेटस विजय आनंदा पवार यांनी पाहिल्यानंतर त्यांनी दोघांना लगेच फोन लावला. परंतु कोणीच फोन उचला नाही. यानंतर आनंदा पवार यांनी भुसार मालाच्या गोडाऊनवर जाऊन पाहिले असता गोडाऊनमध्ये योगेश आणि ज्ञानेश्वर यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. विजय पवार यांनी तात्काळ ग्रामीण पोलिसांशी संपर्क करून दोन्ही युवकांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली. सपोनि. प्रल्हाद मुंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास आडे यांनी सहकार्यासोबत घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही युवकांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

‘आईबाबा आम्हाला माफ करा. तुम्ही आम्हाला फार कष्ट करून मोठे केले. पण आमच्यामुळे तुम्हाला कोणी वाईट बोलेल हे आम्हाला सहन होणार नाही. आमच्यावर शेख मोईन याने भोकरदन येथे खोटा गुन्हा दाखल केला आहे. मोईन हा त्याचा एक मित्र शेख मुश्ताक व एक महिलेला घेऊन लोकांच्या शेतात रात्री येत होता, आम्ही त्यांना पकडले. परंतु, त्याने आम्हालाच फसविण्याचा प्रयत्न केला. आम्हाला आमच्या आईवडिलांचा अपमान सहन होणार नाही. त्यामुळे आम्ही आत्महत्या करीत आहोत. आमच्या मृत्यूनंतर रडू नका. आमच्या बहिणीचे थाटात लग्न करा. आमच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोपींना पोलिसांना फाशीची शिक्षा द्यायला लावा. आमच्या परिवाराला 30 लाख रुपये आर्थिक मदत द्या’, असे या व्हाट्सअप स्टेटस वरील सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, याप्रकरणी युवकांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Comment