मोटारसायकची दोन चारचाकी वाहनांना जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी

 

औरंगाबाद । गजानन महाराज मंदिर रोड वरील राधाकृष्ण मंगल कार्यालय कडे डॉ. सखा पाटील यांची चारचाकी गाडी क्र -MH20 BQ 3555 वळण घेत असतांना गाडी क्र MH20 EJ 5401 दुचाकी चालक सौरभ मोहिते वय २२ वर्षे याने जोरदार धडक दिली. त्या धाकडेत नंतर समोरुन रिलायंस मॉल कडून राधाकृष्ण मंगल कार्यालय कडे जाणारे हिरालाल राठोड यांच्या MH20 FP 2727 ( फोर्चयूनर) या गाडीला जोरदार धडक दिली.

प्रत्यक्ष दर्शी असलेल्या लोकांनी अपघाता विषयी सांगितले कि हा अपघात इतका भयंकर होता कि क्रेटा गाडी चे एअर बॅग ओपन झाले होते . या अपघातात सौरभ हा गंभीर जखमी झाला आहे आणि त्यात रुगणालयात भरती करण्यात आले आहे

सध्या तरी या अपघातामुळे कुठली हि जीवितहानी झाली नाही. सदरील घटनेचि तक्रार जवाहरनगर पोलीस ठाण्यात नोंदवली गेली आहे. नेहमीच या रस्त्यावर वर्दळ असते आणि अश्याच प्रकारचे अपघात घडत असतात.

You might also like