औरंगाबाद : कडक लॉकडाऊन असूनही शहरात खुनासारखे गंभीर गुन्हे घडत आहे. शनिवारी (दि 24) च्या रात्री 9 वाजता घडलेल्या मयुरपार्क येथे यश महेंदकर (21 रा एस.बी.ओ.ए शाळा) या तरुणाच्या खुनातील आरोपीला राज नामदेव जाधव (19 रा. छत्रपती हॉल जवळ, हर्सूल परिसर) याला रविवारी न्यायालयाने 27 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वादाचे कारण काय?
गेल्या वर्षभरापूर्वी राज आणि यश हे चांगले मित्र होते काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाले त्यानंतर राज आणि यश एक एकमेकांकडे रागाने बघायचे ‘तो माझ्याकडे रागाने बगतो म्हणून मी त्याला मारणार’ असे राजने अनेक वेळा मित्रांना बोलून दाखवले.
राजचा मागील रेकॉर्डवर एक गुन्हा दाखल?
हर्सूल पोलीस राजचा मागील रेकॉर्ड तपासत आहे राजच्या विरोधात अल्पवयीन असताना एक मारहाणीचा गुन्हा आहे पण यावर पोलिसांकडून दुजोरा मिळाला नाही