औरंगाबाद : अज्ञात कारणावरून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी गांधेली येथे उघडकीस आली आहे. ज्ञानेश्वर पंढरीनाथ तळेकर (वय 40) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वरने मंगळवारी दुपारी अज्ञात कारणावरून घरातील छताच्या लोखण्डी हुकला दोरी बांधून गळफास घेतला. हा प्रकार सायंकाळी साडे पाच वाजता घरच्यांच्या लक्षात आले. नातेवाईकांनी घटनेची माहिती पोलिसांना देत ज्ञानेश्वरला फसवरून उतरवत त्याला बेशुद्ध अवस्तेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तो पर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. घाटीतील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत. ज्ञानेश्वरने आत्महत्या सारखा टोकाचा पाऊल कोणत्या कारणाने उचलला हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.त्याच्या आत्महत्येच्या नातेवाईकाना देखिल धक्का बसला आहे.