कर्ज फेडता न आल्याने तरुण शेतकऱ्याने उचलले ‘हे’ पाऊल

अकोला : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही वर्षांपासून विदर्भ आणि मराठवाड्याला अतिवृष्टी आणि दुष्काळाने मोठ्या प्रमाणात ग्रासले आहे. या सगळ्या संकटाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवले आहे. यावर्षी देखील विदर्भ आणि मराठवाड्याला अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात झोपडले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सततच्या अस्मानी संकटामुळे राज्यातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतीतून काहीच उत्पन्न निघत नसल्याने अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले. तसेच हे कर्ज फेडता न आल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

अशीच एक मन सुन्न करणारी घटना अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील सायखेड या ठिकाणी घडली आहे. यामध्ये एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव नारायण असे असून तो अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील सायखेड येथील रहिवासी आहेत. मृत नारायण यांनी आपल्या सहा महिन्यांच्या बाळाच्या पाळण्याच्या दोरीच्या सहाय्य्यने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. मृत नारायण यांच्यावर शोकाकुल वातावरणात सायखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत नारायण यांच्या आई सुमनबाई यांच्या नावावर असलेल्या शेत जमिनीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक धाबा येथून दोन वर्षांपूर्वी पीक कर्ज घेण्यात आले होते. हे पीककर्ज अजूनही थकीत आहे. यातील काही कर्ज माफ झाले होते. तरीदेखील 96 हजार रुपयांचं कर्ज मृत नारायण यांच्यावर होते. पण सततची नापिकी, दुष्काळी स्थिती उद्भवल्याने नारायण यांना आईच्या नावावरील कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पण कर्जाची परतफेड कशी करायची याची चिंता त्यांना सतावत होती. यामुळे त्यांनी याच चिंतेतून आपल्या आयुष्याचा शेवट केला.

You might also like