चंद्रपूर हादरलं ! तरुणीचा डोके छाटलेल्या आणि नग्नावस्थेत आढळला मृतदेह

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी एका तरुणीचं डोकं छाटलेला मृतदेह आढळून आला आहे. तसेच हा मृतदेह नग्नावस्थेत होता. हि घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरामध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात एका निर्घृण हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. नग्नावस्थेत असलेले डोकं छाटलेले एका युवतीचे शव मिळाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भद्रावतीच्या ITI च्या मागील भागात हा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर भद्रावती पोलीस, फॉरेन्सिक डॉक्टरांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक स्वतः घटनास्थळी दाखल झाले. यानंतर या संवेदनशील घटनेच्या तपासासाठी पुराव्याची शोधमोहीम सुरू करण्यात आली. मृत तरुणी कोण आहे ? तसेच तिच्यासोबत हे घृणास्पद कृत्य कोणी केले ? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. या प्रकरणी आरोपींनी कोणताच पुरावा न सोडल्याने आरोपींना शोधणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.