परभणी | भांडणाच्या जुन्या वादातून एका युवकावर शस्त्राने वार केल्याची घटना शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास धार रोड परिसरात घडली आहे.
शहरामध्ये मागील काही दिवसापासून धारदार शस्त्रानेचा सर्रास वापर केला जात आहे. धार रोड येथील भागातील सय्यद आतिक सय्यद जावेद हे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घरी आले होते. काही वेळाने दूध आणण्यासाठी म्हणून ते किराणा दुकानावर जात असताना चार आरोपींनी त्यांना थांबविले. जुना भांडणाच्या वादातून चाकूने वार करुण त्यांना जखमी केले.
सय्यद अतिक सय्यद यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी सय्यद जाकेर यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलिस ठाण्यात चार आरोपीविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पिपळवाड हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.