Monday, February 6, 2023

पैसे परत करूनही तगादा लावल्याने तरुणाची आत्महत्या; दोघांविरोधात गुन्हा दाखल

- Advertisement -

औरंगाबाद : उसने घेतलेले पैसे परत करूनही पैसे अजूनही बाकी आहेत. बाकीचे पैसे द्या असा सततचा तगादा लावल्याने कंटाळून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे ज्ञानेश्वर पंढरीनाथ तळेकर ( 40, रा. गांधेली, ता. औरंगाबाद ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना गांधेली शिवारात ही घडली.

अनिल हिवराळे ( रा. एकनाथनगर, औरंगाबाद ) आणि दीपक अशी संशयितांची नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी सांगितले, मंगळवारी ज्ञानेश्वरने गळफास घेतला होता. हा प्रकार सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास लक्षात आला. त्याला बेशुद्ध अवस्थेत घाटीत दाखल करण्यात आले होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा तेथे सुसाईड नोट मिळाली. त्यात हिवाळेकडून घेतलेले पैसे त्याला पूर्णपणे परत करूनही तो आणखी पैशांसाठी सतत त्रास देत शिवीगाळ करत असून जिवे मारण्याच्या धमक्या देत आहे. आणि
मारहाण करीत असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, असा उल्लेख आढळून आला.

- Advertisement -

ज्ञानेश्वर तळेकरला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून हिवाळेसह दीपक नावाच्या दोन व्यक्तीवर चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रदीप ठुबे करीत आहेत.