औरंगाबाद – मोबाइलवर विषप्राशन करण्याचा व्हिडिओ तयार करत एका तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो पाहताना भल्या-भाल्यांना हादरा बसू शकतो. माझ्यामुळे कुटुंबियांना टेंशन येत असून त्यासाठीच मी जीवन संपवतोय, अशी वाक्य हा तरुण व्हिडिओमध्ये बोलतो. त्यानंतर एकानंतर अशा दोन्ही विषाच्या बाटल्यांमधील विष ग्लासमध्ये ओतून ते पिऊन घेतो. तसेच माझ्या या कृतीसाठी मीच जबाबदार आहे, इतर कुणालाही जबाबदार धरू नये, त्यांना त्रास देऊ नये, अशी वारंवार विनवणी तो व्हिडिओतून करतो. विषप्राशन केल्यानंतर तरुणाने स्वतःच हा व्हिडिओ बंद केल्याचे दिसते. पण आत्महत्येच्या या व्हिडिओमुळे औरंगाबादमध्ये खळबळ माजली आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो नेमका कुणाचा आहे, याचा शोध घेतला गेला. मोबाइलवर व्हिडिओ तयार करून आत्महत्या केल्याची ही घटना कन्नड तालुक्यातील आहे. तालुक्यातील एका निर्जन स्थळी तरुणाने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तपासानंतर या तरुणाची ओळख पटली. कन्नडमधीलच सुनील ढगे असं या तरुणांचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तो अत्यंत निराश अवस्थेत होता. यामुळे कुटुंबियांना त्याचं टेंशन होतं, याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे.
दरम्यान व्हिडिओतील ठिकाणाचा माग घेत, पोलीस आणि तरुणाचे नातेवाईक सदर स्थळावर पोहोचले. तरुणाला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचे प्राण गेले गेले होते. विषप्राशन केल्यानंतर काही वेळातच त्याचे प्राण गेले होते, असं डॉक्टरांनी सांगितलं. सुनीलच्या या कृत्यामुळे कुटुंबियांना मोठा हादरा बसला आहे.