औरंगाबाद : पत्नी माहेरी निघून गेल्यामुळे तणावात असलेल्या 36 वर्षीय व्यक्तीने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजता शिवाजीनगर येथे घडली.
कपिल गंगाधर घाडगे 36 नाना रोशनगाव तालुका बदनापुर जिल्हा जालना हल्ली मु. इंद्रा नगर गारखेडा असे मयताचे नाव आहे.
कपिल हे सेंट्रींग काम करायचे घरगुती वादातून वर्षभरापूर्वी त्यांची पत्नी माहेरी निघून गेली आहे.
यातूनच दुपारी त्यांनी शिवाजीनगर रेल्वे रुळावर रेल्वे रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.
त्यांच्या खिशातील आधार कार्डमुळे ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.
शाळेत सहाय्यक फौजदार चव्हाण तपास करीत आहेत.