हृदयद्रावक! “माझ्या मागे रडू नका, कारण…” फेसबुकवर पोस्ट करत तरुणाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलन : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने फेसबुकवर एक पोस्ट लिहून आत्महत्या केली आहे. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या या फेसबुक पोस्टमध्ये आपल्या आत्महत्येचं कारण सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

२९ वर्षीय मुकुल वारिया हा तरुण लग्न आणि इव्हेंट्सच्या डेकोरेशनचे प्रोजेक्ट घेत होता. मंगळवारी त्याने राहत्या घरातील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला त्या अवस्थेत पाहून कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयाता दाखल केले. मात्र त्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. या तरुणाची आई नोकरी करून कुटुंबाचा सांभाळ करते. दर दुर्दैवाची बाब म्हणजे या तरुणाच्या वडिलांनीही काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.मुकुलने हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये त्याने एका पोलीस कर्मचाऱ्यावर छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच अखेरच्या वेळी एक ऑर्डर रद्द करावी लागली. त्यामुळे त्याच्याकडे ३५ हजार रुपये परत मागितले जात आहेत.

या सर्वामुळे मी एकटा पडलो आहे. मला माफ करा मी आता खूप थकलोय. माझे कुटुंबीय माझ्यामुळे कधी समाधानी राहू शकले नाहीत. आता मी अडचणीत सापडलो आहे. आता मला या अडचणींना तोंड देणे जमत नाही आहे. या फेसबुक पोस्टमध्ये मुकुलने कुटुंबीयांसोबतच एका मैत्रिणीची माफी मागितली आहे. यामध्ये तो म्हणाला कि, तिनेसुद्धा मला खूप समजावले. पण मी समजू शकलो. नाही. तर त्याने अजून एका मुलीवर त्याला फसवल्याचा आरोप केला आहे. मी त्या मुलीवर खूप प्रेम करत होते. मात्र तिने अन्य कुणाबरोबर तरी अफेअर सुरू होते. तरीही तिने मला खोटी स्वप्ने दाखवली. अखेरीस त्याने सर्वांची माफी मागितली आणि लिहिले की,”Don’t cry because it’s over smile because it happened.”

Leave a Comment