औरंगाबाद : चार वेळा लग्नाची मागणी टाकूनही चार वेळा निराशाच पदरी पडल्याने त्याने दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी केली. मुलीचे वडील अर्धांगवायू होते आणि आई सावत्र असल्याने वसाहतीत राहणाऱ्या ट्रॅव्हल्स वर नोकरी करणाऱ्या तरुणाने या तरुणीसोबत आणि या मैत्रीतूनच त्याला एकतर्फी प्रेम झाले.
राहुल राजू रॉयल (22रा.पुसद जिल्हा यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे तो सातवी पास असून शहरातील एका ट्रॅव्हल्स एजन्सी मध्ये कामाला होता. आणि याच दरम्यान राहुल ची ओळख या सदर तरुणीसोबत झाली. आणि या ओळखीचे रुपांतर हळूहळू मैत्री मध्ये झाले. राहुल एकटाच राहत असल्याने येणारा पगार खाणे-पिणे यावरच उडवित असे. तरुणीसोबत फिरताना काढलेले सोबतचे फोटोज त्याच्या जवळ होते. आणि या मैत्रीतुन राहुल ला तरुणीवर एकतर्फी प्रेम झाले त्याने काही दिवसांनी तरुणीला लग्नाची मागणी घातली मात्र तरुणीने नकार दिला.
राहुल ने एकदा सोडून चारदा लग्नाची मागणी तरुणी जवळ केली. मात्र ती दरवेळेस त्याला नकारच देत होती. तिला अद्दल घडविण्यासाठी त्याने सोशल मीडियावर तिच्या नावाने बनावट खाते तयार करून दोघांचे छायाचित्र टाकत होता. सुरुवातीस त्याला समज देण्यात आली मात्र तो काही थांबला नाही. यामुळे तरुणीने औरंगाबाद ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पोलिस अधिकाऱ्यांनी बारकाईने तपास सुरू केला. तपासादरम्यान या सगळ्यामागे राहुल राहुल रॉय असल्याचे समोर आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक घुगे, हवालदार कैलास कामठे, संदीप वर्पे ,रवींद्र लोखंडे, नितीन जाधव, योगेश मोहीम, सविता जायभाये, लखन पंचाळे, योगेश दवंडे, गजानन बनसोड, मुकेश वाघ, रूपाली ढोले यांच्या पथकाने केली.