रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान हेलिकॉप्टरमधून पडून तरुणाचा मृत्यू; पहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | झारखंडमधील देवघर येथील रोपवे दुर्घटनेला तब्बल 40 तास उलटूनही बचावकार्य पूर्ण होऊ शकले नाही. सध्या 10 जण रोपवेच्या ट्रॉलीमध्ये आहेत. त्यातच दरम्यान, रेस्क्यू ऑपरेशन सुरु असतानाच हवाई दलाचे हेलिकॉप्टर पकडण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या विडिओ मध्ये आपण पाहू शकता की, सदर व्यक्ती हेलिकॉप्टरमधून दोरीला घट्ट पकडताना दिसत आहे. मात्र, त्याला आत खेचलं जात असतानाच तो घसरला आणि खाली पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी येथील उपस्थितांनी आक्रोश केल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, रविवारी घडलेल्या रोप वे दुर्घटनेत तब्बल ४८ जण अडकले होते त्यातील ३८ लोकांची सुटका करण्यात भारतीय वायुसेना आणि NDRF पथकाला यश आले आहे तर अद्याप १० जण सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत.

पहा संपूर्ण घटना

रामनवमीला रविवारी देवघरच्या त्रिकूट डोंगरावर पूजा करण्यासाठी आणि भटकंती करण्यासाठी शेकडो पर्यटक दाखल झाले होते. रोपवेवरून एक ट्रॉली खाली येत होती, जी वर जाणाऱ्या ट्रॉलीला धडकली. या अपघातात ट्रॉलीमधील लोक जखमी झालेअसून अपघातानंतर सुमारे दोन डझन ट्रॉली हवेतच होत्या. त्यावेळी घाईघाईने अनेकांची सुटका करण्यात आली. मात्र, या अपघातात 48 जण हवेत लटकले होते. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने बचाव करून खाली आणले जात आहे. तथापि, बचाव करणे तितके सोपे नाही कारण लोक सुमारे 1,500 फूट उंचीवर अडकले आहेत. झारखंड पर्यटन विभागाच्या मते, ७६६ मीटर लांबीचा त्रिकूट रोपवे हा भारतातील सर्वात उंच उभा रोपवे आहे.

Leave a Comment