हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या डिजिटल युगात, ऑनलाईन फूड ऑर्डरिंग सेवा झपाट्याने वाढत आहेत. मोबाईल अँप्सद्वारे घरबसल्या जेवण मिळवणे इतके सोपे झाले आहे की, लोक त्याचा वापर रोजच्या जीवनात मोठ्या प्रमाणात करत आहेत. पण हि ऑनलाईन ऑर्डर शरीरासाठी घातक ठरू शकते. सोशल मीडियावर फूड ऑर्डर करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. त्याने ऑनलाईन फूड ऑर्डरचा धक्कादायक व्हिडोची इन्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामुळे तुम्ही जर ऑनलाईन जेवण मागवत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे.
चिकनच्या तुकड्यात जिवंत आळ्या –
झेप्टोवरून (zepto) चिकन ऑर्डर करणाऱ्या एका तरुणाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्याला चिकनच्या तुकड्यात जिवंत आळ्या सापडल्या आहेत. व्हिडीओमध्ये त्याने ते स्पष्टपणे दाखवत आहे की, चिकनच्या तुकड्याभोवती अनेक आळ्या रेंगाळत होत्या, आणि या दृश्याने त्याला भयंकर संताप आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, अनेक लोकांकडून जोरदार प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
Instagram व्हायरल व्हिडिओ –
https://www.instagram.com/p/DF8ZPjoBJoF/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
अन्न सुरक्षा यावर अधिक लक्ष –
अशा घटनांमुळे ग्राहकांच्या विश्वासाला मोठा धक्का बसतो. सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेने, मांसाहारी पदार्थांमध्ये भेसळ, खराब प्रक्रिया, आणि असुरक्षितता यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकारामुळे आपण आपल्या खाण्याबाबत अधिक जागरूक आणि सावधगिरी राखणे महत्त्वाचे आहे. ग्राहकांच्या विश्वासाचे संरक्षण करणे आवश्यक आहे, त्यासाठी खाद्यप्रक्रिया आणि अन्न सुरक्षा यावर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.