अवघ्या चोविसाव्या वर्षी घेतले टेरेसगार्डनवर विविध भाज्या, मसाले आणि फुलांचे पीक 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्याच्या काळात अनेकजण टेरेस गार्डन, किचन गार्डन तसेच विविध प्रकारच्या गार्डनिंग कडे वळलेले पाहायला मिळतात. तरुण पिढीही मोठ्या प्रमाणात यात रस घेताना दिसून येते आहे. उत्तर प्रदेश मधील रायबरेली जिल्ह्यात राहणाऱ्या एका २४ वर्षाच्या मुलानेही आपली ही आवड जपत टेरेस गार्डन फुलविले आहे. अनुभव शर्मा असे त्याचे नाव आहे. तो सध्या पदवी घेऊन बँकेच्या परीक्षांची तयारी करतो आहे. आणि गार्डनिंगची आवडही जपतो आहे. लहान पणापासूनच झाडे लावण्याकडे त्यांचा कल चांगला असल्या कारणाने त्यांनी टेरेसवर विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली.

२०१५ सालापासून त्यांनी आपल्या टेरेसवर आपली छोटी शेती फुलवायला सुरुवात केली होती. आज या शेतीत जवळपास ३०० हुन अधिक झाडे आहेत. सुरुवातीला साध्या गार्डनिंग पासून त्यांनी सुरुवात केली आणि हळूहळू शेतीत रूपांतर केले. आता त्यांच्या या शेतीत भाज्या, औषधी वनस्पती, फळे आणि मसाले उगविण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्यांना एक मिश्र बाग बनवायची आहे असेही ते सांगतात.

अनुभव म्हणतात, “गार्डनिंग करण्यासाठी कोणताही ऋतू उपयुक्त असतो. फक्त त्याची सुरुवात होणे गरजेचे असते.” ते आपला सकाळ आणि संध्याकाळ असा दोन्ही वेळ त्यांच्या गार्डन मध्ये घालवितात. आपल्या अभ्यासातही यामुळे फायदा होत असल्याचे सांगत असताना यामुळे मानसिक तणाव ही दूर होतो असे ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment