तरुणाने उड्डाणपुलावरून टाकली धावत्या रेल्वेवर उडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : एका 25 वर्षीय तरुणाने उड्डाणपुलावरून धावत्या रेल्वेवर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.यामध्ये तो तरुण गंभीर जखमी झाला असून त्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास राजूनगर जवळील पुलावर घडली. सोनू यादव वय-25 वर्ष (रा.मूळ, उत्तर प्रदेश, ह.मुं.औरंगाबाद) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सोनू हा व्यवसाया निमित्त वाडीला सोबत औरंगाबादेत आला होता. त्या रात्री दारूच्या नशेत राजूनगर येथील पुलावरून रेल्वे जात असताना त्या धावत्या रेल्वेवर उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सुदैवाने तो बचावला मात्र या मध्ये त्याचे दोन्ही पायाची हाडे व पाठीची हाडे फॅक्चर झाली त्याला गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांनी घाटी रुग्णालयात दाखल केले.त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला होता हे स्पष्ट होऊ शकले नाही.अशी माहिती पोलिसांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment