बाबो !! तरुणाने चक्क 360 डिग्रीत फिरवली मान ; पहा हा भन्नाट व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगात कोणी काय करू शकेल याचा काही नेम नाही. जीवघेणे स्टंट करण्यात काही तरबेज असतात .अनेक हॉरर चित्रपटांमध्ये तुम्ही भयावह दृश्य नेहमीच पाहत असाल. हॉरर चित्रपटात पाहिलेल्या सीनच्या चर्चा अनेकवेळा होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. @GaurangBhardwa या ट्विटर युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्वतःला चॅम्प समजत असाल तर हे करून दाखवा असं त्याने या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आतापर्यंत १९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून १ हजारापेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.

या व्हिडिओ मध्ये समुद्राच्या किनारी बसलेल्या एका तरुणाने स्वतःचीच मान तब्बल 360° मध्ये फिरवली आहे.दरम्यान, या व्हिडिओ ला नेटकर्यांनी लाईक्स चा पाऊस पाडलेला असून गमतीशीर प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’