व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत तरुणाने आयुष्याला केले ‘गुडबाय’

औरंगाबाद – व्हॉट्सअपच्या स्टेटसला गुडबाय असे लिहून एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे औरंगाबाद शहरात घडली. मूळचा हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेला हा तरुण औरंगाबादमधील फायनान्स कंपनीत काम करत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागे मधुकर तुरुकमाने (वय 25 ) असे मृत तरुणाचे नाव आहे. नागेशचे शिक्षण एम.ए. पर्यंत झालेले आहे. तो मूळचा हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असून लहानपणापासून तो औरंगाबाद शहरातील भावसिंगपुरा येथील पेठेनगर भाहगात रहात होता. आत्या मुंबई येथे कामानिमित्त गेल्या होत्या. नागेश घरात एकटाच होता. मंगळवारी रात्री मुंबईहून रेल्वेने त्याच्या आत्या औरंगाबादेत आल्या. त्यांनी नागेशला घेण्यासाठी ये, असा फोन केला. मात्र मी थकलो आहे, असे नागेशने त्यांना सांगितले. त्यामुळे आत्या नातेवाईकांच्या घरी झोपल्या.

दरम्यान पोलिसांनी तरुणाच्या मोबाइलचा तपास केल्यानंतर, त्याने रात्री तीन वाजता व्हॉट्सअपचे स्टेटस बदलले व त्यात गुडबाय असे लिहिले. तसेच हा मेसेज त्याने मावस भावालादेखील केला. त्यानंतर घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली. पहाटे झोपेतून उठल्यावर मावस भावाने त्याचा मॅसेज पाहिला व आत्याला याबाबत कल्पना दिली. आत्याने तातडीने घर गाठले तेव्हा आत नागेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी छावणी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुरेश जिरे करीत आहेत.